17 July 2019

News Flash

आयुष्मानने सांगितला ‘आर्टिकल १५’च्या चित्रिकरणातील थरारक अनुभव

आयुष्मान ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून हे अनुभव शेअर केली आहेत.

२०१८ या वर्षामध्ये ‘अंधाधून’, ‘बधाई हो’ यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा अभिनेता आयुष्मान खुराना चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. ‘आर्टिकल १५’ असं आयुष्मानच्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. सध्या चित्रिकरणात व्यस्त असलेल्या आयुष्मानने चित्रपटाच्या सेटवरील एक अनुभव नुकताच शेअर केला आहे.

कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेल्या आयुष्मानने ‘आर्टिकल १५’ साठी कंबर कसली असून या चित्रपटातील एका दृश्याचं चित्रिकरण करताना त्याला आलेल्या अडचणी त्याने ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

चित्रपटातील एका सीनसाठी आयुष्मानला दलदलीमध्ये उतरावं लागलं. या दलदलीमध्ये असंख्य जळू होते. मात्र चित्रिकरण पूर्ण करण्यासाठी आयुष्मान आणि त्याचे सहकलाकार या दलदलीमध्ये उतरले. दलदलीत उतरल्यानंतर हे जळू आयुष्मान आणि त्याच्या सहकलाकारांच्या अंगावर येत होते. परंतु या परिस्थितीमध्येही त्यांनी या भागाचं चित्रिकरण पूर्ण केलं. हे चित्रिकरण झाल्यानंतर आयुष्मानने सोशल मीडियावर त्याचा हा अनुभव शेअर केला आहे.

“आजचा दिवस आमच्यासाठी फारच कठीण होता. मात्र या कठीण प्रसंगातही माझ्या सहकार्यांनी माझी साथ दिली. चित्रपटातील एका भागासाठी आम्हाला दलदलीत उतरावलं लागलं होतं. या दलदलीमध्ये असंख्य जळू होते. ज्यामुळे आम्हाला चित्रिकरण करताना अनेक अडचणी आल्या. मात्र माझ्या सहकलाकारांनी या परिस्थितीवर मात केली. विशेष म्हणजे आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने आम्हाला मदत केली. आमच्यासाठी मदतीला धावून येणाऱ्या सेटवरील तपास अधिकाऱ्यांचेही मनापासून आभार. तसंच या शूटसाठी माझ्या सहकलाकारांचं आणि चित्रपट दिग्दर्शकांचे करावं तेवढं कौतुक कमी आहे”.

दरम्यान,‘आर्टिकल १५’ आयुषमानसोबत ईशा तलवार, सयानी गुप्ता, मोहम्मद जीशान अय्यूब आणि कुमुद मिश्राही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

 

First Published on March 15, 2019 5:31 pm

Web Title: ayushmann khurrana share his article 15 shooting experiences