28 February 2021

News Flash

आयुषमान खुरानाने आणली समलिंगी लव्हस्टोरी

२१ फ्रेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांच्या ‘दोस्ताना’ या चित्रपटाने एक अनोखा प्रयोग केला होता. २००८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट चक्क दोन पुरुषांच्या प्रेमप्रकरणावर आधारित होता. ही गे लव्हस्टोरीवर प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि त्यांनी चित्रपटाला सुपरहिट केले होते. या संकल्पनेवर आधारित आता आयुषमान खुरानाचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

आयुषमानने या चित्रपटाचा ट्रेलर ट्विट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. “शुभ मंगल सावधान या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता आम्ही ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट घेऊन तुमच्या भेटीस येत आहोत. आम्ही यावेळी खूप मेहनत केली आहे. तुम्ही देखील थोडे अधिक प्रेम द्या.” अशा आशयाचे ट्विट आयुषमानने केले आहे.

या चित्रपटात आयुषमानबरोबर प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल राय देखील झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवल्य याने केले आहे. येत्या २१ फ्रेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 5:35 pm

Web Title: ayushmann khurrana shubh mangal zyada saavdhan mppg 94
Next Stories
1 “मला बायल्या चिडवायचे, टॉयलेटला गेल्यानंतर मागे यायचे”, प्रणितने सांगितला गंगापर्यंतचा खडतर प्रवास
2 बुडणाऱ्या प्रितीला वाचवण्यासाठी धावला श्वान
3 Hacked trailer: पहिल्याच चित्रपटात हिना खान देणार हॉट सीन्स
Just Now!
X