News Flash

आयुषमान खुराना पडद्यावर दिसणार नव्या भूमिकेत; आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल

आयुषमानने या चित्रपटातील फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे.

आयुषमान खुराना हा बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. आयुषमान एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘डॉक्टर जी’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. आता या चित्रपटातील आयुषमानचा फर्स्ट लूक समोर आला आहे. हा लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

‘डॉक्टर जी’ या चित्रपटात आयुषमान खुरानासोबत अभिनेत्री रकुलप्रीत सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप करणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून चित्रपटात आयुषमान आणि रकुल डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आयुषमानने स्वत: ट्विटर अकाऊंटवर चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा लूक शेअर करत त्याने ‘डॉक्टर जी तुम्हाला भेटण्यासाठी तयार आहे. आता चित्रीकरणास सुरुवात’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : तुम्ही सेविंग्स का ठेवत नाही?; सविता बजाज यांच्या परिस्थितीवर सचिन पिळगावकरांची प्रतिक्रिया

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत आयुषमानने या चित्रपटाची तोंड भरुन स्तुती केली होती. तो म्हणाला होता की, “पहिलं पान वाचताच मी या पटकथेच्या प्रेमात पडलो. ही खूपच सर्जनशील पटकथा आहे. प्रेक्षकांना हसवताना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न हा चित्रपट करणार आहे. मी आयुष्यात पहिल्यांदाच एका डॉक्टरच्या भूमिकेत झळकणार आहे. मी ही भूमिका साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे.”

आयुषमान हा एक प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो आपल्या प्रत्येक चित्रपटात काहीना काही नवा प्रयोग करताना दिसतो. ‘विक्की डोनर’, ‘बरेली की बर्फी’, ‘बधाई हो’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटानंतर पुन्हा एकदा आयुषमान जंगली पिक्चर्स या प्रोडक्शन हाऊससोबत काम करत आहे. या पार्श्वभूमीवर प्रेक्षक ‘डॉक्टर जी’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 12:41 pm

Web Title: ayushmann khurrana upcoming movie doctor g first look viral avb 95
Next Stories
1 “अभिनेत्री अधिक मानधन मागत असेल तर…”: करीनासंदर्भातील प्रश्नावर ‘सुची’चं सूचक विधान
2 Video: भर पावसात रात्री ३ वाजता मिका सिंगची गाडी बंद पडली अन्…
3 नेहा धूपियाने पुन्हा दिली गुड न्यूज; फोटो शेअर करत म्हणाली…
Just Now!
X