10 April 2020

News Flash

राष्ट्रीय पुरस्कारानंतर आयुषमानने वाढवलं मानधन; एका जाहिरातीसाठी घेणार इतके कोटी रुपये

आता आगामी चित्रपटांसाठीही त्याचं मानधन वाढणार असल्याची शक्यता आहे.

आयुषमान खुराना

दर्जेदार चित्रपटांमध्ये चौकटीबाहेरच्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता आयुषमान खुरानाने नुकताच राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. ‘अंधाधून’ या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारानंतर आता आयुषमानने त्याचं मानधन वाढवलं आहे. ‘मि़ड डे’नं दिलेल्या वृत्तानुसार, आयुषमानने जाहिरातींसाठी तिप्पटहून अधिक मानधन वाढवलं आहे.

आता तो एका जाहिरातीसाठी साडेतीन कोटी रुपये आकारतो. नुकतंच त्याने मलबार हिल इथल्या बंगल्यात एका जाहिरातीसाठी शूटिंग केलं. यावेळी आयुषमानच्या टीमने साडेतीन कोटींहून कमी मानधन घेण्यास नकार देत होती. याआधी तो एका जाहिरातीसाठी ९० लाख रुपये ते एक कोटीपर्यंत मानधन घेत होता. त्यामुळे आता आगामी चित्रपटांसाठीही त्याचं मानधन वाढणार असल्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : वयाच्या 12व्या वर्षी ठेवले होते शरीरसंबंध; रणवीर सिंगचा खुलासा 

आयुषमानने ‘अंधाधून’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल १५’ अशा दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली. आता तो ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपट आणखी एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ड्रीम गर्ल’नंतर आयुषमान ‘शुभ मंगल फिर से सावधान’ या चित्रपटात झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 6:03 pm

Web Title: ayushmann khurrana used to charge rs 1 crore per ad now he raised his fees ssv 92
Next Stories
1 …तर मिकानंतर सलमान खानवरही येणार बंदी?
2 लोक मला बोल्ड भूमिकेसाठीच फोन करतात – माही गिल
3 वयाच्या 12व्या वर्षी ठेवले होते शरीरसंबंध; रणवीर सिंगचा खुलासा
Just Now!
X