News Flash

आयुषमानच्या पत्नीला पुन्हा कॅन्सरचं निदान

धीरानं या परिस्थितीचा सामना करा असा संदेश तिनं पोस्टद्वारे दिला आहे.

Ayushmann Khurrana wife Tahira
आयुषमान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप

अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपला पुन्हा एकदा कॅन्सरचं निदान झालं आहे. आपल्याला स्टेज 0 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे दिली होती. त्यावर तिने उपचारही घेतले. किमोथेरेपीचे सहा सेशन्स आणि मास्टेक्टॉमीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ताहिराला पुन्हा एकदा स्टेज 1a ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित ताहिराने याविषयीची माहिती दिली.

ताहिरा ही ३५ वर्षांची आहे. इन्स्टाग्राम पोस्ट मार्फत तिनं खुलेपणानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ‘हा अत्यंत कठीण आहे, पण तोपर्यंत तुम्हाला तुमच्यात असलेल्या छुप्या शक्तीचा, ताकदीचा अंदाज येत नाही. जेव्हा असा एखादा कठीण प्रसंग तुमच्यासमोर येऊन उभा ठाकतो, तेव्हा तुम्हाला त्या ताकदीचा अंदाज येतो. आयुष्यात येणाऱ्या या अडथळ्यांमुळेच तुम्ही आणखी सहनशील, आणखी ताकदवान होता असं मला वाटतं. मला स्टेज 1a कॅन्सरचं निदान झालं आहे आणि त्याच्या उपचारासाठी मला १२ किमोथेरेपी घ्यावे लागणार आहे. त्यापैकी सहा झाले असून आणखी सहा बाकी आहेत. कॅन्सरशी झुंज देण्याच्या माझ्या आतापर्यंतच्या प्रवासासाठी मी ही पोस्ट समर्पित करते. हा प्रवास अर्धा संपला आणि अर्धा बाकी आहे,’ असं म्हणत तिने काहींचे आभार मानले आहेत. या आजारपणात तिला साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं नाव लिहित तिने या पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले आहेत.

कॅन्सर कोणालाही होऊ शकतो त्यामुळे जर अशी लक्षणं दिसू लागली तर स्वत:ची काळजी घ्या, आधी चाचणी करा योग्य उपचार घ्या, धीरानं या परिस्थितीचा सामना करा असा संदेश तिनं पोस्टद्वारे दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 12:43 pm

Web Title: ayushmann khurrana wife tahira diagnosed with cancer again
Next Stories
1 2.0 ची पायरसी रोखण्यासाठी १२ हजार वेबसाईट्स ब्लॉक
2 #Mauli Trailer : ‘आपल्या सारखा TERROR नाय’, रितेशच्या ‘माऊली’चा ट्रेलर प्रदर्शित
3 ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर स्वप्नील-मुक्ताची धमाल
Just Now!
X