X

अभिनेता आयुष्मान खुरानाच्या पत्नीला कॅन्सर

ताहिरा ही ३५ वर्षांची आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून तिनं कॅन्सर झाला असल्याची माहिती दिली.

अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप- खुराना हिला कॅन्सरचं निदान झालं आहे. ताहिरानं इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित स्टेज 0 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली आहे. सध्या आपण उपचार घेत असून आपली प्रकृती ठिक असल्याची माहितीही तिनं सोशल मीडयाच्या माध्यमातून दिली आहे.

ताहिरा ही ३५ वर्षांची आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून तिनं कॅन्सर झाला असल्याची माहिती दिली. तसेच इन्स्टाग्राम पोस्ट मार्फत तिनं खुलेपणानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. माझ्यासारख्या अनेक महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी मी हि पोस्ट लिहिली आहे असं ताहिरानं म्हटलं आहे.

कॅन्सर कोणालाही होऊ शकतो त्यामुळे जर अशी लक्षण दिसू लागली तर स्वत:ची काळजी घ्या, आधी चाचणी करा योग्य उपचार घ्या, धीरानं या परिस्थितीचा सामाना करा असा संदेश तिनं पोस्टद्वारे दिला आहे. तसेच उपचारामुळे मी आता सुखरुप आहे असंही तिनं सांगितलं आहे. ताहिराचा कल हा दिग्दर्शनाकडे अधिक आहे. नुकतंच ताहिरानं ‘टॉफी’ या लघुपटाचंही दिग्दर्शन केलं आहे.

‘मी आशा सोडली होती. पण आता ताहिरा पूर्णपणे बरी झाली आहे तिला नुकताच डिस्चार्जही देण्यात आला आहे’ अशी माहिती पती आयुष्मान खुरानानं दिली आहे.

First Published on: September 22, 2018 6:31 pm