बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप सतत चर्चेत असतात. नुकताच ताहिराने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिने त्यांच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाल्याचे म्हटले आहे.

ताहिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये ती कुत्र्याच्या पिल्लासोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘आमच्या कुटुंबातील नवी सदस्य. ही एक मुलगी आहे आणि तिचे नाव पीनट आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. पीनट ही ताहिरा आणि आयुषमानची नवी पाळीव कुत्री आहे.

ताहिराच्या या पोस्टवर आयुषमानचा भाऊ अपारशक्ती खुरानाने कमेंट केली आहे. ‘आम्ही आपल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी येत आहोत’ असे त्याने कमेंटमध्ये म्हटले आहे.

तर क्रिती सेनॉनने देखील यावर कमेंट केली आहे. तिने आम्ही पीनटला भेटण्यासाठी आतुर आहे असे म्हटले आहे.