News Flash

..या पुरस्कारासाठी कंगनाने दिले हृतिकच्या नावाला प्राधान्य

कंगना आणि हृतिकमधील वाद अद्यापही संपलेला नाही

कंगना रणौत

बॉलिवूडमध्ये दर दिवशी एक नवी घटना घडत असते. त्यातही विविध विषयांवर कलाकारांच्या वक्तव्यांमुळे विविध चर्चांनाही उधाण येत असते. बी टाऊनमध्ये कलाकारांमध्ये जोडली जाणारी नाती आणि त्यांच्या नात्यांमध्ये काही कारणास्तव येणाऱ्या दुराव्यामुळेही कलाकारमंडळी नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपासून हिंदी चित्रपटसृष्टील अशीच एक बहुचर्तिच जोडी एकमेकांवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रकाशझोतात आली आहे. ती जोडी म्हणजे कंगना रणौत आणि हृतिक रोशन.

नुकतीच कंगना अभिनेत्री नेहा धुपियाच्या #NoFilterNeha या कार्यक्रमामध्ये आली होती. या कार्यक्रमामध्ये नेहासोबत विविध विषयांवर गप्पा मारताना कंगनाने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. गप्पा-गप्पांमध्ये ज्यावेळी कंगनाला विचारण्यात आले की, ‘Thank God they have famous parents or they’d be nowhere’ हा पुरस्कार ती कोणाला देऊ इच्छिते? त्यावेळी काही क्षणांचे मौन पाळल्यानंतर कंगनाने ‘हृतिक रोशन……तुलाही माहित आहे की हे खरं आहे’, असे उत्तर दिले.

केवळ वडिलांच्या नावाला मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळेच हृतिकच्या वाट्याला हे यश आणि प्रसिद्धी आली आहे असे म्हणण्याकडेच बहुधा कंगनाचा इशारा असावा. तिच्या उत्तरामुळे तरी असाच अंदाज लावण्यात येत आहे. कंगनाने दिलेले हे उत्तर पाहता या दोन्ही कलाकारांमध्ये सुरू असणारा वाद अद्यापही संपलेला नाही असेच दिसतेय. कंगना आणि हृतिक ज्या कार्यक्रमांना हजेरी लावतात त्या कार्यक्रमांमध्ये त्यांना प्रसारमाध्यमांच्या विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. याआधीही कंगनाला प्रसारमाध्यमांनी तिच्या आणि हृतिकदरम्यान सुरू असणाऱ्या वादाविषयीचे प्रश्न विचारले असता तिने प्रत्येक वेळी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण कंगनाच्या तुलनेत हृतिक याबाबतीत उघडपणे अपली भूमिका मांडण्यास फारसे प्राधान्य देत नाही. या दोन्ही कलाकारांमध्ये सुरू असलेल्या वादामागचे खरे कारण खुद्द हृतिक आणि कंगनाच चांगले जाणतात. पण, या वादांमुळे हे दोघेही चर्चेचा विषय ठरतात हे खरे.

दरम्यान, कंगनाने ज्या कार्यक्रमामध्ये हे वक्तव्य केले आहे, तो कार्यक्रमही सध्या चर्चेत आहे. #NoFilterNeha या चॅट शोमध्ये विविध कलाकार हजेरी लावत आहेत. कलाकार आणि नेहा धुपिया दरम्यान रंगणाऱ्या गप्पांच्या ओघात चित्रपटसृष्टीतील काही गुपितंही उघड होत आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम सोशल मीडियावरही बराच चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 12:06 pm

Web Title: b towsns queen kangana ranaut took one more sly dig at hrithik
Next Stories
1 दिवाळीच्या निमित्ताने हिमांशूने दिली अमृताला खास भेट
2 बहुचर्चित ‘काबिल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
3 Video: त्याने ‘किस’ करुन अनुष्काच्या गाण्याला दिली दाद
Just Now!
X