दिग्दर्शक मीलन लुथारिया दिग्दर्शित आणि अभिनेता अजय देवगणचा अभिनय असलेला ‘बादशाहो’ चित्रपट काल सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘कच्चे धागे’, ‘चोरी-चोरी’ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ नंतर मीलनचा अजय देवगणबरोबरचा हा चौथा चित्रपट. या चित्रपटाला प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. आणीबाणीच्या काळावर आधारित असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.०३ कोटी रुपयांची कमाई केल्याचे ट्विट व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी केलेय.

वाचा : जुळ्या, तिळ्या नव्हे तर सहा मुलांना अक्षयने दिला जन्म!

अजय देवगण, इम्रान हाश्मी, इषा गुप्ता, इलियाना डीक्रूझ, विद्युत जामवाल आणि संजय मिश्रा यांसारखी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘बादशाहो’ ची निर्मिती भूषण कुमार आणि मीलन लुथारिया यांनी केलीये. अजय आणि इम्रानची जोडी तिसऱ्यांदा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहावयास मिळतेय. याआधी त्यांनी ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ आणि ‘दिल तो बच्चा है जी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले.

‘बादशाहो’ हा चित्रपट आणीबाणीच्या काळातील आहे. मात्र आणीबाणीचा काळ इथे फक्त नावापुरताच येतो. केवळ त्या काळाची कथा म्हणून त्या वेळचा सेट राजस्थानमध्ये उभा राहतो. आणीबाणी होती म्हणून कुठल्याशा एका क्षणभरासाठी चमकून जाणाऱ्या प्रसंगात गावकरी फळ्यावर कर्फ्यूची वेळ लिहिताना दिसतो.

वाचा : मृत्यूनंतरही सुरू राहील इंदर कुमारवरील बलात्काराचा खटला

चित्रपटाची कथा- देशात आणीबाणीची परिस्थिती होती आणि राजांचे खजिने त्या काळात जप्त केले जात होते. त्याचदरम्यान जयपूरची महाराणी गीतांजली देवीच्या (इलिया) महालावर छापा पडतो, आणि सरकार खजाना जप्त करते. कारण या खजिन्याची माहिती सरकारला दिलेली नसते. खजिना ट्रकमध्ये भरून दिल्लीचा पाठवण्याचे काम पोलीस अधिकारी सहरला (विद्युत जामवाल) सोपवले जाते. त्यामुळे महाराणी गीतांजली भवानी सिंहला (अजय देवगण) भेटून याबाबत सांगते. भवानी महाराणीची नीकटवर्तीय संजना (इशा गुप्ता), दलिया (इमरान हाश्मी), तिकला (संजय मिश्रा) बरोबर खजिना दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच लुटण्याचा प्रयत्न करतो. त्याचदरम्यान अनेक गुपिते समोर येतात.