सध्या बॉलिवूड सिनेमांमध्ये बागी २ सिनेमाचीच चर्चा होताना दिसत आहे. या सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २५ कोटींची कमाई केली होती. अवघ्या ५ दिवसांत या सिनेमाने १०० कोटींची कमाई केली आहे. ३० मार्चला प्रदर्शित झालेल्या या सिनेमात टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांची मुख्य भूमिका आहे. बागी २ सिनेमाच्या यशाने टायगरने स्वतःचेच अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. टायगरचा हीरोपंती हा पहिला सिनेमा होता. या सिनेमाने तिकीट बारीवर ७२ कोटींची कमाई केली होती. तर फ्लाईंग जट सिनेमाने ५६ कोटी कमावले होते.

टायगरला त्याचे केस फार आवडतात. त्याने आतापर्यंत लांब केस ठेवणेच पसंत केले आहे. पण बागी- २ सिनेमासाठी त्याला केस छोटे ठेवणे गरजेचे होते. टायगरने त्याचे केस छोटे करण्यासाठी एक- दोन दिवस नाही तर तब्बल ५ आठवडे घेतले होते. दर आठवड्याला तो थोडे थोडे केस कापत होता. सिनेमाचा दिग्दर्शक अहमद खानने सांगितले की, टायगरशी केसांबद्दल बोलल्यानंतर तो थोडे केस कापून यायचा. त्याचे केस पाहून आम्ही त्याला अजून थोडे केस कापण्याचा सल्ला द्यायचो. त्यानंतर तो परत केस कापायला जायचा. असे थोड्या थोड्या वेळाने केस कापून आम्ही त्याला आर्मी लूक दिला आहे. आता बागी- २ मधील त्याचा लूक सर्वांनाच पसंत पडत आहे.

सिनेमाच्या यशाचे खरे श्रेय अॅक्शनला दिले जात आहे. या सिनेमासाठी टायगरने हाँगकाँगला जाऊन अॅक्शन दिग्दर्शक टोनी चिंगकडून मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले. त्याने सिनेमाच्या चित्रीकरणाआधी अनेक महिने अॅक्शन सीनचे वर्कशॉपही केले.

baaghi
बागी २

टायगर जेवढा फिट आहे तेवढेच दिशा पटानी दिसणेही आवश्यक होते. त्यामुळेच तिने सिनेमासाठी अॅकोबिकचे प्रशिक्षण घेतले. सिनेमाच्या चित्रीकरणात टायगरला पावसातले अॅक्शन सीन चित्रीत करणे कठीण गेले. आतापर्यंतच्या अॅक्शन स्टंटमध्ये हा सिनेमा सर्वाधिक कठीण असल्याचे त्याने मान्य केले. पावसाच्या भितीने बागी- २ च्या टीमला लवकरात लवकर अॅक्शन सीन चित्रीत करायचे होते. चित्रीकरणादरम्यान पाऊस पडला तर शरीराला पुन्हा वॉर्मअप करावे लागायचे. जे सर्वात कठीण होते.

टायगर बॉलिवूडचा अॅक्शन हिरो झाला आहे. पण फार कमी लोकांना माहीत आहे की त्याला साप, पाल, विंचू आणि जंगली प्राण्यांची फार भिती वाटते. अॅक्शन सीनदरम्यान जेव्हाही त्याच्यासमोर हे प्राणी किंवा किटकं आली तेव्हा त्याला चित्रीकरण पूर्ण करणे कठीण गेले. स्वतः टायगरने हे मान्य केले आहे की, प्राण्यांसोबत चित्रीकरण करणे त्याच्यासाठी कठीण असते.

टायगरने या सिनेमात स्फोटक पदार्थांमध्ये ही चित्रीकरण केले आहे. गोळ्या, बॉम यांच्यामधून पळत जाणं सोपी गोष्ट नव्हती. या सिनेमात टायगर अनेकदा स्फोटकांमधून पळतानाच दिसत आहे. बागी- २ सिनेमा परदेशातही चांगली कमाई करत आहे. टायगरची अॅक्शन पाहून अक्षय कुमारने त्याला बॉलिवूडचा टोनी जा असेही संबोधले आहे.