07 March 2021

News Flash

Baaghi 2 Movie Song: दिशा- टायगरचा कॉलेज रोमान्स पाहिलात का?

पहिल्या प्रेमातला वेडेपणा या गाण्यात दिसून येतो

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचा ‘बागी २’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे ‘मुंडेया तो बचके’ हे गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. आता याच सिनेमातीच ‘ओ साथी’ हे दुसरे रोमॅण्टिक गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातून टायगर आणि दिशाची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येते. पहिल्या प्रेमातला वेडेपणा या गाण्यात दिसून येतो. या गाण्यात टायगर फार ‘स्मार्ट’ दिसत आहे तर दिशा तेवढीच ‘क्यूट’ वाटत आहे.

‘ओ साथी’ गाण्यात टायगर आणि दिशा दोघंही कॉलेज विद्यार्थी दाखवण्यात आले आहेत. दिशा अभ्यासासोबतच खेळ आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणारी विद्यार्थीनी दाखण्यात आली आहे. तर टायगर हा लाजाळू प्रियकरासारखा दिशाला लपून पाहताना दाखवण्यात आला आहे. याआधी ‘बेफिकरे’ गाण्यात दिशा आणि टायगरने त्यांच्या चाहत्यांना वेडे केले होते. तर ‘बागी २’ मधीलच ‘मुंडेया तों बचके’ गाण्यात दोघं स्वतःच्याच धुंदीत बेधुंदपणे नाचताना दिसत आहेत.

यू-ट्यूबवर ‘ओ साथी’ हे गाणे आतापर्यंत २ लाखांहून जास्त वेळा पाहण्यात आले आहे. अहमद खानने या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. येत्या ३० मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमात टायगर ‘रॉकी’ आणि दिशा ‘नेहा’ या व्यक्तिरेखा साकारत आहेत. रोमान्स आणि अॅक्शन प्रेमींसाठी हा सिनेमा म्हणजे एक पर्वणी असेल यात काही वाद नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2018 4:11 pm

Web Title: baaghi 2 tiger shroff and disha patani second song released o saathi see video song
Next Stories
1 …म्हणून प्रियांका चोप्राने मध्यरात्री केला रणवीरला फोन
2 Review: तीच फिरकी, तोच पतंग
3 त्यावेळी आयुष्याला पूर्णविराम देणं हा एकमेव पर्याय उरतो- भन्साळी
Just Now!
X