News Flash

आयआयएममध्ये ‘बाहुबली- २’ ची केस स्टडी

मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून सिक्वल कसा फायदेशीर ठरू शकतो, याचा अभ्यास करणार

बाहुबली २

एस.एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाचा अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. २०१५ मध्ये ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि गेल्या वर्षी त्याचा सिक्वल ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर दणक्यात कमाई केली. म्हणूनच मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून ‘बाहुबली २’चा एक केस स्टडी म्हणून अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

‘कंटेम्पररी फिल्म इंडस्ट्री’ या पर्यायी विषयाअंतर्गत या केस स्टडीचा अभ्यास करण्यात येणार आहे. आयआयएममध्ये केस स्टडी म्हणून समाविष्ट करण्यात आलेला ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ हा पहिलाच चित्रपट आहे. प्राध्यापक भारतन कंदस्वामी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, ‘नवीन शैक्षणिक वर्षात मी बाहुबली २चा केस स्टडी म्हणून अभ्यासक्रमात समावेश करत आहे. यामध्ये मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून एखाद्या चित्रपटाचा सिक्वल कसा फायदेशीर ठरू शकतो याचा अभ्यास शिकवला जाईल. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार सिक्वलपेक्षा प्रिक्वलच चांगले असते, पण कमाईच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास सिक्वल हा प्रिक्वलपेक्षा जास्त कमावतो.’

वाचा : सुप्रीम कोर्टाने दुखावल्या कोट्यवधी हिंदूंच्या भावना- सूरज पाल अमू

‘एखाद्या चित्रपटाचा सिक्वल हा जास्त कमाई करतो. कारण निर्मात्यांना प्रिक्वलच्या यशाचे गणित समजलेले असते. चित्रपट कला आणि त्यातील कलात्मकतेचा विचार करून कशाप्रकारे सिक्वलचे निर्णय घेणे गरजेचे असतात, यासंदर्भातील मार्केटिंग मंत्रावर या अभ्यासक्रमात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कला, व्यवसाय आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख मिलाप साधणे महत्त्वाचे असते आणि ‘बाहुबली २’ त्याचे उत्तम उदाहरण आहे,’ असे ते म्हणाले.

बाहुबलीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही चाहत्यांनी ही माहिती देण्यात आली आहे. प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी, रम्या कृष्णन आणि सत्यराज यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 4:55 pm

Web Title: baahubali 2 becomes a case study at iim ahmedabad
Next Stories
1 उर्मिला- आदिनाथ कोठारेला कन्यारत्न
2 सरस्वती आणि देवाशिषचं लग्न होणार?
3 घटस्फोटानंतर हृतिक-सुझान पुन्हा करणार लग्न?
Just Now!
X