News Flash

पायरसीमुळे ‘बाहुबली २’ला फटका; पोलिसांकडे तक्रार दाखल

'बाहुबली २'च्या निर्मात्यांना खूप मोठं नुकसान झाल्याचा दावा या संघटनेच्या सदस्यांनी केला आहे.

या वेबसाईटने दिग्दर्शक एसएस राजामौलीच्या 'बाहुबली द कन्क्लुजन' चित्रपटाची पायरेटेड कॉपी इतरही काही वेबसाईटवर अपलोड केल्याचा आरोप त्याने केला आहे.

तमिळ चित्रपट निर्माता संघटनेचा नवनियुक्त अध्यक्ष आणि अभिनेता विशाल याने तमिळ रॉकर्स या पायरसी वेबसाईटविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या वेबसाईटने दिग्दर्शक एसएस राजामौलीच्या ‘बाहुबली द कन्क्लुजन’ चित्रपटाची पायरेटेड कॉपी इतरही काही वेबसाईटवर अपलोड केल्याचा आरोप त्याने केला आहे. निर्माता संघटनेच्या प्रतिनिधींनी रविवारी शहर पोलीस आयुक्त करण सिंघ यांची भेट घेतली. तमिळ रॉकर्स या नावाने पायरसी करणाऱ्या इंटरनेट माफियांविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी या संघटनेने केली आहे.

पायरसीमुळे ‘बाहुबली २’च्या निर्मात्यांना खूप मोठं नुकसान झाल्याचा दावा या संघटनेच्या सदस्यांनी केला आहे. पायरेटेड व्हर्जन दाखविणाऱ्या वेबसाईटचे अधिकार काढून घ्यावेत आणि त्यामागे असणाऱ्या व्यक्तींना तुरुंगात टाकावे, अशी मागणीदेखील सदस्यांनी केली आहे. या संघटनेने ‘बाहुबली २’ बेकायदेशीरपणे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेबसाईट्सच्या आयपी अॅड्रेसचा शोध घेतल्याचेही तक्रारीत म्हटलेय. ‘बाहुबली २’च्या निर्मात्यांनीच स्वतः तमिळ चित्रपट निर्माता संघटनेकडे पायरसीविषयी तक्रार केली होती.

इंटरनेट पायरसीसोबतच या चित्रपटाला तमिळनाडूनमध्येही टीव्ही पायरसीचा सामना करावा लागत आहे. याच कारणामुळे जवळपास ३०० चित्रपटांचे सेटलाइट अधिकार अद्याप कोणीही विकत घेतलेले नाहीत. यामध्ये रजनीकांत यांचा ‘कबाली’ आणि ‘थेरी’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचाही समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 2:19 pm

Web Title: baahubali 2 faced humongous loss due to piracy vishal lodges police complaint
Next Stories
1 … या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसोबत शाहरुखचं नातं तरी काय?
2 शाहिदची पत्नी मीरा राजपूतने वाहतुकीचे नियम मोडले आणि…
3 …या आहेत बॉलिवूडमधील ‘सिंगल मदर्स’
Just Now!
X