संपूर्ण भारतात केवळ आणि केवळ ‘बाहुबली २’ चित्रपटाचीच चर्चा आहे. दिग्दर्शक एस एस राजामौली, प्रभास यांच्याबरोबरच अभिनेता राणा डग्गुबती या सर्वांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत. त्याच्या कामाचे समीक्षकांकडूनही कौतुक केलं गेलंय. चित्रपटात भल्लाल देवची भूमिका साकारण्यासाठी राणाने त्याच्या शरीरयष्टीत बदल आणण्याकरिता जे कष्ट घेतले त्याची बरीच चर्चाही झाली. पण, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या आणि अनेक तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याला एका डोळ्याने दिसत नाही? होय, राणाला एका डोळ्याने दिसत नाही. याबद्दल त्याने स्वतःच सांगितले आहे.

तेलगुमध्ये एक सेलिब्रिटी चॅटशो होतो. यात सामान्य व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील मोठ्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी सेलिब्रिटी मदत करतात. तसेच, एक दिवसासाठी त्या व्यक्तीचे काम स्वतः करून त्यांना दहापट जास्त कमाई मिळवून देतात. गेल्यावर्षी या शोमध्ये राणा डग्गुबती गेला होता. शोमधील राणाच्या एण्ट्रीने तेव्हा प्रेक्षकांना धक्का बसलेला. यावेळी राणाने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट सांगितली. तो म्हणाला की, ‘मी तुम्हाला काही सांगू का….. मला एका डोळ्याने दिसत नाही. मी फक्त डाव्या डोळ्याने बघू शकतो. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर मला एक डोळा दान करण्यात आला होता. त्यामुळे मी निदान एका डोळ्याने तरी बघू शकतो. जर मी डावा डोळा बंद केला तर मला समोरचं काहीच दिसणार नाही. तुम्ही अंध असल्यामुळे किंवा कोणत्याही भीतीमुळे तुमचं आणि तुमच्या मुलांचं आयुष्य थांबणार नाही, असे राणाने शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धक महिलेला सांगितले.

everyone will do campaign for Mahayuti candidate without getting upset says Neelam Gorhe
कोणीही नाराज न होता महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा : नीलम गोऱ्हे
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

चित्रपटसृष्टीतील आठ वर्षांच्या कारकिर्दीत राणाने विविध भूमिका साकारल्या. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली द बिगनिंग’ चित्रपटाने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर आता ‘बाहुबली २’ या चित्रपटालाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जगभरात जवळपास २०० कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.