‘बाहुबली २’ हा सिनेमा २८ एप्रिलला देशभरात प्रदर्शित झाला. हा सिनेमा कधी येतोय याचीच वाट बाहुबलीचे चाहते पाहात होते. कटप्पाने बाहुबलीला का मारले? याचे उत्तर मिळवण्यासाठी प्रेक्षक कित्येक तास रांगेत उभे राहून सिनेमाचे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कटप्पाची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सत्यराज आणि शिवगामी देवीची भूमिका वठवणारी अभिनेत्री रम्या कृष्णन यांची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. सत्यराज अनेक वर्षांपासून एका कपड्यांच्या कंपनीचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. या जाहिरातीत सत्यराज तामिळनाडूचा एक राजा दाखवण्यात आला आहे, जो आपल्या राणीला कोणत्याच गोष्टीसाठी नाही बोलत नसतो. या जाहिरातीला बाबुशंकर बाळासुब्रमण्यम नावाच्या युट्यूब चॅनलवरून शेअर करण्यात आलंय.

सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर एस एस राजामौली दिग्दर्शित प्रभास आणि राणा डग्गुबती यांच्या भूमिका असलेला ‘बाहुबली २’ या सिनेमाने आतापर्यंत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. जगभरात ‘बाहुबली’ सिनेमा सुमारे ९००० स्क्रिन्सवर दाखवण्यात येत आहे. ‘बाहुबली’ सिनेमाची प्रेक्षकांमध्ये एवढी क्रेझ आहे की, दाक्षिणात्य राज्यांत चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच आठवड्याभराचे सर्व शो हाऊसफुल्ल झाले होते. आतापर्यंत या सिनेमाने सर्वात जास्त कमाई दाक्षिणात्य राज्यांतच केली आहे.

UPSC third topper Donuru Ananya Reddy told Virat Kohli is her inspiration
VIDEO : UPSC परिक्षेत तिसरा क्रमांक पटकावणारी अनन्या मानते कोहलीला आदर्श; म्हणाली, “विराटचा अ‍ॅटिट्यूड…”
Rupee hits all time low against US Dollar
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी 
Shubman Gill Surpasses Virat Kohli and Sanju Samson in Unique Record
IPL 2024: शुबमन गिलने विराट-सॅमसनला मागे टाकत रचला इतिहास, आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
share market today
शेअर बाजारात नव्या उच्चांकाची गुढी; Sensex ची ७५००० हजारांच्या पुढे उसळी

‘बाहुबली’च्या पहिल्या भागापेक्षाही दुसऱ्या भागाची उत्सुकता लोकांमध्ये अधिक पाहायला मिळते आहे. त्याचे कारणही तसेच आहे म्हणा. कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नावर बाहुबलीचा पहिला भाग संपवण्यात आला होता. त्यामुळे दुसऱ्या भागात या प्रश्नाचे उत्तर मिळेल या उत्सुकतेपोटी प्रेक्षकांनी सिनेमागृहात गर्दी केली होती. ‘बुकमायशो’ या ऑनलाइन तिकीट बुकिंग साइटने अधिकृतरित्या सांगितले होते की, ‘बाहुबली २’ च्या ऑनलाइन तिकीट बुकिंगने आधीचे सर्व रेकॉर्ड मोडून काढले आहेत. एका दिवसात १० लाख तिकिटांची ऑनलाइन विक्री करण्यात आली आहे.