मनोरंजन म्हटलं की अनेकांच्या मनात विविध चित्रपटांची नावं येतात. भारतामध्ये प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन अगदी त्याच धाटणीचे चित्रपट बनवण्याकडे चित्रपट निर्मात्यांचा कल असतो. मुख्य म्हणजे अवघ्या दोन- तीन तासांच्या चित्रपटामध्ये कथानक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या या कलेचं कौतुक करावं तितकं कमीच. प्रेक्षकांसाठी फक्त मनोरंजनाचं साधन असणाऱ्या या चित्रपटांच्या निर्मितीसाठी किती खर्च आणि प्रयत्नांची पराकाष्ठा असते याचा आपण कधी विचारही करत नाही.

मुख्य म्हणजे गेल्या बऱ्याच दिवसांपासून बिग बजेट चित्रपटांची जास्त धूम पाहायला मिळते आहे. भारतात बनलेल्या या बिग बजेट चित्रपटांमध्ये राजामौलींचा ‘बाहुबली २’ आणि सुपरस्टार रजनीकांत, अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘२.०’ याच चित्रपटांची नावं समोर येत आहेत. पण, या चित्रपटांव्यतिरिक्त इतरही काही चित्रपट आहेत ज्यांच्या निर्मितीसाठी बरीच रक्कम खर्च करण्यात आली आहे. अशाच काही चित्रपटांचा आपण आढावा घेणार आहोत.

बाहुबली- द बिगिनिंग : २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं बजेट जवळपास १८० कोटी रुपये इतकं होतं. मुख्य म्हणजे ‘बाहुबली’ फ्रॅन्चायझीमधील या पहिल्या चित्रपटामुळेच या ‘बाहुबली २’ला इतकी लोकप्रियता मिळाली आहे. एस.एस. राजामौलींच्या चमूने बिग बजेट चित्रपटाचं हे आव्हान चांगलच पेललं आहे.
332842-baahubali

प्रेम रतन धन पायो : सलमान खान आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘प्रेम रतन धन पायो’ या फॅमिली ड्रामा प्रकारात येणाऱ्या चित्रपटाचा निर्मिती खर्च १७५ कोटी रुपये असल्याचं समोर आलं. सूरज बडजात्या आणि सलमान खान या चित्रपटांच्या निमित्ताने एकत्र आले होते. सलमान-सोनम व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये स्वरा भास्कर, नील नितिन मुकेश, अनुपम खेर आणि इतर काही प्रसिद्ध चेहरेसुद्धा झळकले होते.
premratandhanpayo759

धूम ३ : या चित्रपटाचं कथानक आणि काही थरारकदृश्यं पाहता त्यासाठीचं बजेट जास्त असणार असा अंदाज अनेकांनीच बांधला होता. चित्रपटांशी निगडीत एका वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार १७५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये ‘धूम ३’ हा चित्रपट साकारला होता.
m_id_425009_dhoom3-poster

दिलवाले : अभिनेत्री काजोल आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खान यांच्या जोडीने रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटातून कमबॅक केलं होतं. या एव्हरग्रीन जोडीच्या साथीनं रोहितने १६५ कोटींच्या बजेटमध्ये ‘दिलवाले’ साकारला होता. पण, प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात हा चित्रपट अपयशी ठरला.
shah-rukh-khan

बँग बँग : हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘बँग बँग’च्या निर्मितीसाठी १६० कोटी रुपयांचा खर्च आला होता. या बिग बजेट चित्रपटाचं चित्रीकरण थायलंड, ग्रीस, अबुधाबी, पॅराग्वे या नयनरम्य ठिकाणांवर करण्यात आलं होतं.
bang-bang

बाजीराव- मस्तानी : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे एका ऐतिहासिक कथानकाची प्रेक्षकांसाठी केलेली सिनेमॅटिक मांडणीच म्हणावी लागेल. पेशवे बाजीराव आणि मस्तानी यांचं खुललेलं प्रेम आणि मराठा साम्राज्य, तत्कालीन परिस्थिती अशा एकंदर कथानकावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं होतं. ऐतिहासिक काळ साकारण्यासाठी या चित्रपटावर १४५ कोटी रुपयांचं बजेट खर्ची घालण्यात आलं होतं.
bm

विविध हिंदी आणि इंग्रजी वेबसाईट्सच्या आधारे बजेटचे हे आकडे मांडण्यात आहेत, यासंदर्भात निर्मात्यांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.