‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांचे रिपोर्ट्स देखील निगेटिव्ह आले आहेत. जवळापास दोन आठवडे उपचार घेतल्यावर राजामौली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी करोनावर यशस्वीरित्या मात केला आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

“दोन आठवडे क्वारंटाइन होऊन पूर्ण झाले आहेत. आता आमच्यात करोनाची कोणतीच लक्षणं नाहीत. तसंच करोना चाचणी केल्यावर माझे आणि कुटुंबीयांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसंच आम्ही प्लाझ्मा डोनेशनसाठी तयार आहोत की नाही जे कळण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागेल”, असं ट्विट राजामौली यांनी केलं आहे.

Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Vijay Salvi in ​​Kalyan
कल्याणमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय साळवी यांच्या शिवशाही-ठोकशाही चित्ररथाला पोलिसांची हरकत

दरम्यान, राजामौली यांनी करोनावर मात केल्यामुळे चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. २९ जुलै रोजी राजामौली यांनी करोना झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.सोबतच त्यांच्या कुटुंबीयांनादेखील करोना झाल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.