21 September 2020

News Flash

‘साहो’साठी प्रभासला मिळालं ‘बाहुबली २’पेक्षा जास्त मानधन?

आकडा पाहून तुम्हीही व्हाल थक्क

प्रभास

दाक्षिणात्य चित्रपटांची व्याप्ती वाढतेय ही बाब गेल्या काही वर्षांमध्ये चांगलीच समोर आलीये. या चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांचा वाढता आकडा पाहता हिंदी चित्रपटसृष्टीसाठी ही एक तगडी स्पर्धा ठरत आहे. प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या अशाच काही चित्रपटांमध्ये अग्रस्थानी आहेत ते म्हणजे एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ हे चित्रपट. भव्यतेची परिभाषा बदललेल्या या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाचा आकडाही तितकाच तगडा होता. पण, आता मात्र प्रभाससाठी ‘बाहुबली २’ साठी मिळालेलं मानधनही कमीच ठरत आहे. कारण, आगामी ‘साहो’ या चित्रपटासाठी त्याला जवळपास ३० कोटी रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे.

‘साहो’ या चित्रपटामध्ये प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री श्रद्धा कपूरला या चित्रपटासाठी ४ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केलं होतं. तर एका वेबसाइटच्या वृत्तानुसार तिला ९ कोटी रुपये मिळणार असल्याचंही म्हटलं जात होतं. मुख्य म्हणजे श्रद्धा्च्या मानधनाच्या तुलनेतही प्रभासच्या मानधानाचा आकडा बराच मोठा आहे. राजामौलींच्या ‘बाहुबली २’ या चित्रपटासाठी प्रभासला २५ कोटी रुपयांचं मानधन मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, आता मात्र त्याला थेट ३० कोटी रुपये इतकं मानधन मिळणार असल्यामुळे अनेकजण थक्क झाले आहेत.

वाचा : ‘चक दे! इंडिया’विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘साहो’ आतापासूनच चर्चेत येण्यास सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई, अबूधाबी आणि रोमानिया येथे करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे प्रभासचं आतापर्यंत कधीही न पाहिलेलं रुप या चित्रपटातून पाहण्यास मिळणार असल्यामुळे या चित्रपटाविषयी आतापासूनच बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘आशिकी गर्ल’ श्रद्धा कपूर आणि ‘बाहुबली’ प्रभास ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, अभिनेता नील नितिन मुकेश या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 4:06 pm

Web Title: baahubali fame actor prabhas reportedly receives three times than co actor shraddha kapoors fee for the film
Next Stories
1 … म्हणून दिव्यांकाला मुलीचं मातृत्त्व नकोय
2 ‘या’ अटीवर करिनाने सैफशी बांधली लग्नगाठ
3 रिया सेन याच्याशी बांधणार लग्नगाठ?
Just Now!
X