‘बाहुबली’ सीरिजमधून जगभरात प्रसिद्धी मिळवणारी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा आज वाढदिवस. यानिमित्ताने तिच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आलाय. ‘बाहुबली’ सीरिजनंतर अनुष्काचा ‘भागमती’ हा पहिलाच चित्रपट असेल. चित्रपटातील अनुष्काच्या भूमिकेबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आली नसली, तरी तिचा फर्स्ट लूक मात्र नक्कीच चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवणारा आहे.

वाचा : कॅन्सरग्रस्त कल्पना लाजमींच्या मदतीसाठी सरसावला आमिर

जी. अशोक दिग्दर्शित ‘भागमती’मध्ये उन्नी मुकुंदन आणि आदी पिनिसेट्टी कलाकारही दिसतील. तसेच, मल्याळम अभिनेता जयरामदेखील यात झळकणार आहे. तेलगू, तमिळ आणि मल्याळम या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणारा अनुष्काचा हा चित्रपट एक हॉरर थ्रिलर आहे. देवसेनाप्रमाणेच भागमतीच्या लूकमधील अनुष्का प्रेक्षकांचे मन पुन्हा एकदा जिंकण्यात यशस्वी ठरते का, ते पाहणे औत्सुक्याचे राहिल.

TOP 10 NEWS वाचा : ‘फॅनी खान’पासून बिग बॉसपर्यंत, मनोरंजन विश्वातील सर्व घडामोडी

‘बाहुबली २ द कनक्ल्युजन’च्या अभूतपूर्व यशानंतर प्रभास आणि अनुष्काची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे. हे दोघंही त्यांच्यातील नाते लपवत असून, ते या वर्षाअखेरपर्यंत लग्न करणार असल्याचे म्हटले जातेय.