‘बाहुबली’ चित्रपट सर्वार्थाने यशस्वी ठरला आहे. चित्रपटसृष्टीतील सर्व विक्रम तर या चित्रपटाने मोडले आहेत. त्याचसोबत या चित्रपटामुळे कितीतरी बेरोजगारांनाही छोटेमोठे काम मिळाले. ‘बाहुबली’मुळे अनेक कलाकारांच्या प्रसिद्धीत आणि चाहत्यांमध्ये दुप्पटीने वाढ झाली. बाहुबली, देवसेना, भल्लाल देव, अवंतिका, शिवगामी देवी, कटप्पा, बिज्जलदेव या सर्व पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. ही पात्रं आता कायमस्वरुपी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतील यात शंका नाही. यापैकीच एक पात्र म्हणजे बिज्जलदेव.

एसएस राजामौलीच्या या भव्य चित्रपटात भल्लाल देवच्या वडिलांची म्हणजेच ‘बिज्जल देव’ची भूमिका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नसर यांनी साकारली आहे. ते एक अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक तर आहेतच पण, एकवेळ अशी होती जेव्हा त्यांनी हॉटेलमध्ये वेटरचेदेखील काम केले होते. बालचंदर यांच्या १९८५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने नसर यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यात त्यांनी सहायक अभिनेत्याची भूमिका केली होती. खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या नसर यांच्या कामाचे प्रेक्षकांनी नेहमीच कौतुक केले.

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

नसर यांनी आजपर्यंत २०० पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केलेय. मात्र, ‘बाहुबली’तील बिज्जल देवच्या भूमिकेत त्यांना सर्वाधिक पसंती मिळाली. नसर हे आज एक यशस्वी अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक आहेत. पण, एकेकाळी त्यांच्यावर हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ आली होती. सिल्वहर स्क्रिन या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटसृष्टीत नावारुपास येण्यापूर्वी नसर यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेटरचे काम केले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी सुरक्षारक्षकाचीही नोकरी केली होती.

दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच त्यांनी बॉलिवूडमध्येही काम केले आहे. ‘चाची ४२०’, ‘फिर मिलेंगे’, ‘साला खडूस’, ‘तुतक तुतक तुतिया’, ‘डेव्हिड’, ‘रावडी राठोड’ या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘गाझी अटॅक’ चित्रपटातही त्यांनी काम केले होते.