20 November 2017

News Flash

PHOTOS : श्रद्धासाठी प्रभासने दिली खास ‘दावत’

काही सुरेख क्षण अनुभवण्याची संधी श्रद्धाला मिळाली

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 12:20 PM

छाया सौजन्य- सोशल मीडिया

‘आशिकी २’ फेम अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या ‘हसीना पारकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण, त्यासोबतच तिच्या आगामी चित्रपटाच्या चर्चांनाही उधाण आलंय. श्रद्धाच्या आगामी चित्रपटाच्या चर्चा रंगण्यामागचं कारणही तसंच आहे. सध्याच्या घडीला लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अभिनेता प्रभाससोबत श्रद्धा स्क्रीन शेअर करणार आहे. ‘साहो’ चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा आणि ‘बाहुबली’ प्रभास एकत्र आले असून, हैदराबादमध्ये त्याचं चित्रीकरणही सुरु झालं आहे. श्रद्धानेही सेटवर येण्यास सुरुवात केली असून, तिच्या येण्याच्या निमित्ताने प्रभासने एक खास बेत आखला होता.

‘साहो’च्या टीमने आणि प्रभासने मिळून ‘आशिकी गर्ल’साठी तेलगू खाद्यपदार्थांची दावत ठेवली होती. श्रद्धानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘इन्स्टा स्टोरी’मध्ये यासंबंधीचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये बरेच खाद्यपदार्थ पाहायला मिळत असून, खवय्यांच्या तोंडाला त्यामुळे पाणी सुटलं असणार यात शंकाच नाही. कारण, एक दोन नव्हे तर जळपास १५ खाद्यपदार्थ तिच्यासमोर ठेवण्यात आले होते. तिने हा फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिलेलं, ‘टीम साहो आणि खुद्द प्रभास तुम्हाला चवदार पदार्थांची दावत देतात तेव्हा….’

• #Saaho ❣

A post shared by -ˏ` Prabhas Fan Club ˎ´ (@prabhasfcx) on

 

प्रभास आणि त्याच्या टीमचे हे प्रयत्न श्रद्धाला फारच आनंद देऊन गेला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. चित्रीकरणाच्या व्यापातून वेळ काढत कलाकारांनाही थोडीशी उसंत मिळते त्याच वेळचे काही सुरेख क्षण श्रद्धाच्या ‘इन्स्टा स्टोरी’मध्ये पाहायला मिळाले. दरम्यान, ‘साहो’ या अॅक्शनपटासाठी प्रभासने बरीच मेहनत घेतली असून, या चित्रपटातून आतापर्यंत कधीही न पाहिलेली साहससृश्ये पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यातही प्रभास आणि श्रद्धा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे चाहत्यांमध्येही या चित्रपटाविषयी बरंच कुतूहल पाहायला मिळतंय.

First Published on September 13, 2017 12:20 pm

Web Title: baahubali prabhas treats saaho co star shraddha kapoor to some hyderabadi cuisine see photo posted on social media