News Flash

वाढत्या वजनामुळे ‘साहो’मधून अनुष्काची एक्झिट तर या बॉलिवूड अभिनेत्रीची एण्ट्री

अनुष्का आणि प्रभासची अनोखी केमिस्ट्री सगळ्यांनीच पाहिली

वाढत्या वजनामुळे ‘साहो’मधून अनुष्काची एक्झिट तर या बॉलिवूड अभिनेत्रीची एण्ट्री
बाहुबली २

‘बाहुबली’ सिनेमातून अनुष्का आणि प्रभास ही जोडी आणि त्यांच्यातली अनोखी केमिस्ट्री सगळ्यांनीच पाहिली. या जोडीचे आजही अनेकजण दिवाने आहेत. या दोघांची वाढती क्रेझ पाहून ‘साहो’ सिनेमात या दोघांना पुन्हा एकदा एकत्र साइन करण्यात आलं होतं. त्यामुळे ‘साहो’ सिनेमाच्या घोषणेपासूनच या सिनेमाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. पण आता अनुष्का शेट्टीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सुरूवातीला ‘साहो’ सिनेमात अनुष्का शेट्टीचं नाव जरी पुढे आलं असलं तरी आता तिला या प्रोजेक्टमधून वगळण्यात आलं आहे. वाढत्या वजनामुळे तिच्या हातून हा सिनेमा गेला असे म्हटले जात आहे.

पतीसोबत व्हिडिओ चॅट करताना या मॉडेलने घेतला गळफास

आता ‘साहो’मध्ये कोणती अभिनेत्री काम करणार असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असतानाच निर्मात्यांनी त्याचे उत्तरही तयार ठेवले आहे. बॉलिवूडची ‘हसीना’ अर्थात श्रद्धा कपूर आता प्रभाससोबत ‘साहो’ सिनेमात काम करणार हे निश्चित झाले आहे. निर्मात्यांना सुरूवातीपासूनच या सिनेमासाठी एखादी बॉलिवूड अभिनेत्री हवी होती. या सिनेमासाठी निर्मात्यांनी सोनम कपूर, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, तमन्ना भाटिया आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्रींना विचारले होते. पण मानधन जास्त सांगितल्यामुळे निर्माते अनुष्का शेट्टीकडे गेले होते. आता मात्र पुन्हा हा सिनेमा श्रद्धाच्या पदरात पडला असेच म्हणावे लागेल.

शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे शाहरुखला कोर्टाची नोटीस

दरम्यान, श्रद्धाच्या ‘हसीना पारकर’ या आगामी सिनेमाची उत्सुकता सध्या सगळ्यांना आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या सिनेमातून श्रद्धा पहिल्यांदाच कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या बहिणीची म्हणजे हसीना पारकरची भूमिका साकारताना दिसेल. दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत खुद्द श्रद्धाचा भाऊच झळकणार आहे. सिद्धार्थ कपूर आणि श्रद्धा कपूर ही बहिण- भावाची जोडीसुद्धा या सिनेमातील आकर्षणाचा विषय ठरत आहे. १८ ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गुन्हेगारी विश्व, गँगवॉर आणि एका वेगळ्या मुंबईची झलक पाहायला मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 3:59 pm

Web Title: baahubali star anushka shetty replace by shraddha kappor in prabhas saaho movie
Next Stories
1 इशा कोप्पीकरसंदर्भात इंदर कुमारच्या पहिल्या पत्नीने केला हा खुलासा
2 महानायक अमिताभ बच्चन कोणाचे चाहते आहेत माहितीये?
3 आता हेच बाकी होतं, ‘पिया’ आणि त्याची ‘पहरेदार’ जाणार हनिमूनला
Just Now!
X