जॉनी लिव्हर हे बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित विनोदवीर म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर ‘बाझीगर’, ‘करण अर्जुन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘यस बॉस’, ‘बादशाह’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून आपल्या दर्जेदार अभिनयाचं प्रदर्शन केलं. परंतु अभिनय करण दिसतं तितकं सोप नसतो. अनेकदा वैयक्तीक आयुष्यातील दु:ख विसरुन विनोदवीराला प्रेक्षकांना हसवावं लागतं. असाच एक भावूक अनुभव जनी लिव्हर यांनी सांगितला. या प्रतिकूल परिस्थितीत त्यांना अभिनेता शाहरुख खान याने मदतीचा हात पुढे केला होता.

अवश्य पाहा – “भावा तूच खरा रॉकस्टार'”; कंगनाविरुद्धच्या वादात बॉलिवूडनं दिला दिलजीतला पाठिंबा

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत जॉनी लिव्हर यांनी आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी हा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “१९९३ साली आम्ही बाझीगर या चित्रपटाचं चित्रीकरण करत होतो. त्या वेळी मी काही वैयक्तिक कारणांमुळे त्रस्त होतो. माझ्या वडिलांचं ऑपरेशन करायचं होतं. त्यासाठी मला काही पैशांची आवश्यकता होता. परंतु माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे मी टेंशनमध्ये होतो. अभिनयातही माझं लक्ष लागतं नव्हतं. शिवाय चित्रपटात मी विनोदी भूमिका साकारत असल्यामुळे शाहरुखला ते चटकन जाणवलं. त्यावेळी शाहरुखने मला मानसिक आणि आर्थिक आधार दिला होता. त्याच्यामुळेच त्या चित्रपटात मला काम करण्यासाठी पुन्हा एकदा प्रोत्साहन मिळालं.”

अवश्य पाहा – “याला म्हणतात आत्मसन्मान”; ते दृश्य पाहून प्रकाश राज यांनी केलं शेतकऱ्यांचं कौतुक

‘बाझीगर’ हा चित्रपट १९९३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टी यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. हा रिवेंच स्टोरी पठडीतील चित्रपट होता. जॉनी लिव्हर यांच्या अनोख्या विनोदी अभिनयानं हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातूनच जॉनी लिव्हर खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाले असं म्हटलं जातं.