योग गुरु बाबा रामदेव लवकर कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून येणार असल्याचे वृत्त स्पॉटबॉय या वेबसाइटने दिले आहे. या कार्यक्रमामध्ये बाबा रामदेव यांना आणण्यासाठी कपिल शर्माची टीप बऱ्याच दिवसांपासून प्रयत्नशील आहे. द कपिल शर्माच्या टीमच्या प्रयत्नांना यश मिळाले असून पुढच्या आठवड्यामध्ये गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बाबा रामदेव यांच्या सहभाग असणाऱ्या भागाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार असल्याचे वृत्त आहे. बाबा रामदेव यापूर्वी अनेक कार्यक्रमामध्ये हजेरी लावली असल्यामुळे या कार्यक्रमात त्यांच्या सहभागाबद्दल शंका उत्पन्न होत नाही.

यापूर्वी दिल्ली येथील एका कार्यक्रमात आघाडीचा अभिनेता रणवीर सिंहसोबत रामदेव बाबा व्यासपीठावर दिसले होते. या कार्यक्रमात रणवीर सिंहने बाबा रामदेव यांना नृत्य करण्याचा आग्रह केला होता. मात्र रणवीरला त्यांनी नृत्य येत नसल्याचे सांगितले. मात्र आपले प्राविण्य असलेल्या योगाचे प्रात्यक्षित दाखविले होते.  रणवीर सिंहच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील गाण्यावर रामदेव बाबा कठिण योगासने करताना दिसले होते. सुरुवातील रणवीरने बाबासोबत साथ दिली. मात्र बाबा रामदेव यांच्यासमोर रणबीरने हात टेकत माघार घ्यावी लागली होती. यावेळी बाबा रामदेव यांनी रणवीरसोबत कुस्ती खेळण्याचा मानस व्यक्त केला होता. यावरही रणवीरने नकार दिला. या कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी रणवीरला खांद्यावर घेऊन त्याची फिरकी घेतल्याचे दिसून आले होते.

अर्थात बाबा रामदेव जर द कपिल शर्मा शो मध्ये आले तर असाच काहीसा अनुभव कपिलच्या टीमसोबतच प्रेक्षकांना अनुभविण्यास मिळू शकतो. कॉमेडी शोमुळे बॉलीवूडमध्ये चांगलाच जम बसविला आहे. त्याच्या रिअॅलिटी शोमध्ये बॉलीवूकर उपस्थिती लावतात. त्याच्या मान्यवरांच्या लिस्टमध्ये नेहमीच मोठ्या कलाकारांचे नाव असते. आगामी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी त्याचा हा शो एक उत्तम माध्यम बनला आहे. पण, बहुदा तुम्हाला माहित नसेल की कपिलच्या शोमध्ये येणा-या कलाकारांना अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते. सहसा कलाकार सेटवर किंवा मुलाखतीसाठी वेळेवर पोहचत नाहीत म्हणून तक्रार केली जाते. पण कपिलच्या बाबतीत हे उलट आहे. काही संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलच्या सेटवर जाणा-या व्यक्तिंना त्याचीच वाट पाहावी लागते. नुकतीच अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी कपिलच्या रिअॅलिटी शोमध्ये उपस्थिती लावली होती. त्यांच्या आगामी ओके जानू या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता ते या शोमध्ये गेले  होते. बॉलीवूड सेलिब्रिटी असणा-या या दोन्ही कलाकारांना जवळपास पाच ते सहा तास सेटवर कपिलची वाट पाहावी लागल्याचे म्हटले जाते.