News Flash

बाबा सेहगलची ऐकायलाच हवी अशी मजेशीर ‘टर-टर-टर’

गाण्याच्या शब्दांना विशेष अर्थ नसलेला हा धमाल-मस्तीचा व्हिडिओ युट्यूबवर चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

बाबा सेहगलने हा व्हिडियो त्याच्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केला आहे.

संगीतकार आणि रॅपर बाबा सेहगलने त्याच्या ट्विटर खात्यावरून एक नवा म्यूझिक व्हिडिओ ट्विट केला आहे. धमाल-मस्ती स्वरुपातला हा व्हिडिओ आहे. ज्याचे बोल स्वत: बाबा सेहगलनेच लिहिले असून गाण्याचे कंपोजीशनदेखील बाबानेच केले आहे. व्हिडिओमध्ये बाबा अधून-मधून रॅप करतानादेखील नजरेस पडतो. १९९० मध्ये संगीतक्षेत्रात कारकिर्द सुरू केलेला बाबा इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर असून, ‘मिस ४२०’ आणि ‘माय फ्रेण्ड गणेशा’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागात त्याने अभिनयदेखील केला आहे. अंजू सेहगलबरोबरचे त्याचे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांनी एकमेकांपासून फारकत घेणे पसंत केले.
बाबाचा हा व्हिडिओ युट्यूबवर चांगलाच लोकप्रिय झाला आहे. विशेष अर्थ नसलेले हे गाणे बाबाने मस्तीच्या मूडमध्ये बनवलेले दिसते. महागड्या भेटवस्तू, सुट्टीसाठी आलिशान प्रेक्षणीयस्थळाला भेट देणे नेहमीच तुम्हाला आत्मिक शांतात देऊ शकत नाही. आपल्या पाळीव प्राण्यासोबत खेळणे, आपल्या घराची स्वच्छता करणे, गाडीची स्वच्छता करणे, शेजाऱ्यांसोबत संवाद साधणे आणि एखाद्या बेडकाला न्याहाळणेदेखील कधी-कधी तुमचा मूड ठीक करू शकतो. तेव्हा ‘टर टर टर’ करा आणि रिलॅक्स करा तुमचे ‘सर सर सर’, आपल्या व्हिडिओसोबत बाबाने हा संदेश युट्यूबवर लिहिला आहे.

गाण्याचा व्हिडिओ:

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 1:54 pm

Web Title: baba sehgal comedy video tar tar tar getting viral on youtube
Next Stories
1 Big Boss 10:’बिग बॉस’च्या घरात दिसणार नोएडाचा दुधवाला..
2 VIDEO: ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये फवाद खान ऐवजी गजेंद्र चौहान यांची एन्ट्री
3 ‘कोती’ ची गोव्यातील चित्रपट महोत्सवासाठी निवड
Just Now!
X