‘आजा मेरी गाडी में बैठ जा’ अशा रॅप गाण्यांनी तरुणाईला वेड लावलेला बाबा सैगलने यावेळी काळ्या पैशांवरही रॅप गाणे केले आहे. या गाण्यात त्याने काळ्या पैसे बाळगणाऱ्यांवर शेरा मारला आहे आणि पंतप्रधान यांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुकही केले आहे.

बाबा सैगले हे गाणे आजच इण्टरनेटवर शेअर केले आहे. बाबा याने स्वतःनेच या गाण्याचे बोल लिहिले असून संगीतनही त्याचेच आहे. जागरण या संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, बाबा म्हणाला की, ‘मी काळ्या पैशांवर आत्ताच एक गाणे बनवले आहे. जे माझे चाहते आहेत त्यांना माहित आहे की मी माझ्या गाण्यात नेहमीच सहज सोप्या भाषेचा वापर करतो. लोकांच्या नित्यनियमाच्या बोलण्यावरच हे गाणे बनवले आहे.’

या गाण्यात बाबा अशा लोकांना उद्देशून बोलत आहे, जे काळ्या पैशांच्या जोरावर कधी एकटे किंवा कधी संपूर्ण कुटुंबासोबत या पैशांचा आनंद लुटतात. याबद्दल सांगताना बाबा सांगतात की, ‘मी या गाण्यात कोणाचीही मस्करी करत नाही. मी फक्त माझ्या अंदाजात ही गोष्ट लोकांसमोर मांडतो आहे. मोदींच्या या निर्णयाचे मी समर्थन करतो. हा निर्णय नक्कीच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठीच आहे.’

यापुढे बाबा सैगल सांगतो की, ‘त्याने या आधी ट्रम्पवर सुद्धा एक गाणे बनवले होते. पण त्या गाण्यावर लोकांनी मला वाईट प्रतिक्रिया दिल्या होत्या. या गोष्टींचा माझ्यावर काही परिणाम होत नाही.’ यावेळी तो भुतकाळातल्या आठवणी ताज्या करत सांगतो की, सगळ्यात आधी ‘ठंडा ठंडा पाणी’ हे गाणे हिट झाले होते. तो किशोर कुमारचा चाहता होता आणि त्यांच्यासारखेच काहीतरी बनण्यासाठी मुंबईत आला होता. त्याच्या आईने त्याला फक्त ६ महिन्यांचा कालावधी दिला होता आणि बाबाने या कालावधीतच अनेक गोष्टी मिळवल्या होत्या.

त्याची गाणी ‘आजा मेरी गाडी में बैठ जा’, ‘दिल धडके’ ही नव्वदच्या दशकातली हिट गाणी होती. ‘दिल धडके’ हा तेव्हाचा पहिला व्हिडिओ अल्बम होता. बाबाला या संगीत क्षेत्रात एकूण २५ वर्षे झाली आहेत. या काळात त्याने तामिळ, तेलगू या सिनेसृष्टीतही फार काम केले. याशिवाय तो जिंगल्सही बनवत असतो. आपल्या आयुष्यात तो संतुष्ट आहे. कारण त्याचे चाहते त्याला अजूनही विसरलेले नाहीत.