पॉप सिंगर बाबा सेहगलच्या वडीलांचं करोनामुळे निधन झालं. जसपाल सिंह सेहगल असं त्यांचं नाव होतं ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा सेहगल याने सोशल मीडियावरून वडिलांच्या निधनाची बातमी दिली. वैद्यकीय सुविधांच्या आभावामुळे वडिलांचं निधन झाल्याचं तो म्हणाला.

बाबा सेहगलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यात त्याने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे,”आज सकाळी बाबा आम्हाला सोडून गेले. संपूर्ण आयुष्य योद्ध्यासारखं जगले मात्र कोव्हिडसमोर हरले. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बाबाने वडील करोनातून बरे होत असल्याचं सांगितलं. तो म्हणाला,” माझे वडील करोनातून बरे होतं होते. ते माझ्या बहिणीकडे लखनऊमध्ये राहत होते. करोनाची लागण झाल्याने ते क्वारंटाइन झाले. मात्र सोमवारी त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Baba Sehgal (@babasehgal)

“कंगनाच्या बुद्धीला संपूर्ण लॉकडाउन लागलंय!”; महाराष्ट्र सरकारवरील टीकेनंतर कंगना ट्रोल

बाबा सेहगलने सांगिंतलं, ” बऱ्याच वेळाने अ‍ॅम्ब्युलन्स मिळाली .कसं बसं त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात नव्या रुग्णांसाठी बेड नव्हते शिवाय पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध नव्हता. वेळेत सर्व गोष्टी उपलब्ध झाल्या असत्या तर माझ्या वडिलांचे प्राण वाचले असते.” अशी खंत त्याने व्यक्त केली.

सध्याच्या परिस्थितीमुळे बाबा सेहगलला वडिलांचं अंतिम दर्शन घेता आलं नाही. याबद्दल त्याने दु:ख व्यक्त केलं.