News Flash

बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीमध्ये बॉलिवूडची मांदियाळी

या पार्टीत सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या त्या सलमान खान आणि कतरिना कैफवरच.

बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीमध्ये बॉलिवूडची मांदियाळी

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाबा सिद्दीकी यांनी मुंबईमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

या पार्टीला अनिल कपूर, रितेश देशमुख, अमृता खानविलकर, शिल्पा शेट्टी, झरीन खान यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी आवर्जुन हजेरी लावली होती.

फक्त बॉलिवूड कलाकारच नाही तर हिंदी टेलिव्हिजनमधील कलाकारा पार्टीत सहभागी झाले होते.

या पार्टीत सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या त्या सलमान खान आणि कतरिना कैफवरच.

संपूर्ण पार्टीत या दोघांच्याच नावाची चर्चा होती. या इफ्तार पार्टीला सलमानच्या संपूर्ण कुटुंबाने हजेरी लावली होती.

सलमान, कतरिनाशिवाय जॅकलिन फर्नांडिस, सोनू के टिटू की स्विटी स्टार नुसरत भरुचा यांनीही हजेरी लावली होती.

या पार्टीत सलमानची जवळची मैत्रीण नागिन फेम मौनी रॉयही आली होती. मौनीसोबत हिना खाननेही पार्टीला हजेरी लावली होती.

बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील अनेक स्टार स्टायलिश कपड्यांमध्ये आले असताना कतरिनाने मात्र पंजाबी सूटमध्ये येणंच पसंत केलं.

नेमकी याचमुळे ती संपूर्ण पार्टीत चर्चेचा विषय ठरली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2018 10:46 am

Web Title: baba siddique iftar party 2018 salman khan katrina kaif anil kapoor and other celebs in attendance
Next Stories
1 Samantha-Naga Chaitanya wedding : गोष्ट नाग चैतन्य- समंथाच्या प्रेमाची, परिकथेतील लग्नाची…
2 ‘जाऊ नको दूर बाबा…’ वडिलांच्या आठवणीत भावूक प्रियांका
3 ‘ती’चा बाजार
Just Now!
X