राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊ राव क ऱ्हाडे आपला नवा चित्रपट घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. ‘बबन’ हा त्यांचा आगामी चित्रपट ‘ख्वाडा’पेक्षा पूर्णपणे वेगळा असून त्यात बबन (भाऊ साहेब शिंदे) आणि कोमल (गायत्री जाधव) यांची प्रेमकथा बघायला मिळणार आहे.

‘बबन’ ही ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील महाविद्यालयीन युवकाची कथा आहे. या चित्रपटाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे चित्रपटात पाच गाणी असून प्रत्येक गाणं वेगळ्या धाटणीचं आहे. गाणी हा भारतीय सिनेमाचा आत्मा आणि संगीत हे सर्व भारतीयांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग असल्याने आपला दुसरा चित्रपट संगीतमय असावा अशी माझी इच्छा होती’, असे भाऊराव यांनी सांगितले. सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे या दोघींनी या गाण्याचे पाश्र्वगायन केले असून संगीत ओंकार स्वरूप यांचे आहे. प्रा. डॉ. विनायक पवार यांनी गीत लेखन केले आहे. रेकॉर्डिंगला लाइव्ह संगीत असलेल्या या गीताचे शूटिंग प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या तमाशाच्या तंबूत झाले आहे. तर या गाण्यासाठी तालवादक म्हणून संगीतकार प्रीतम यांच्या सोबत काम केलेले दिपेश वर्मा आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे भाचे शिखरनाद कुरेशी यांनी काम पाहिले आहे.  ‘मोहराच्या दारावर..’  या गीतामध्ये दाक्षिणात्य, लावणी आणि बॅले असा तिहेरी संगम असून त्याचे नृत्य दिग्दर्शन नेहा मिरजकर आणि गणेश पतंगे यांनी केले आहे. या गाण्यांचं ध्वनिमुद्रण यशराज स्टुडिओमध्ये झाले असून गाण्याचे मास्टरिंग लंडन येथील स्टुडिओमध्ये करण्यात आले असल्याने रसिकांना एक वेगळी अनुभूती मिळणार आहे.

Dates of 299 exams of Mumbai University summer session announced Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी
nashik accident
नाशिक: शालेय बसला अपघात, चार विद्यार्थी जखमी
panvel municipal corporation
फडके नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ५५ लाख पालिका खर्च करणार
maharashtra government, bsc nursing, government colleges, 7 district, 700 seats, increase,
राज्यात नर्सिंग अभ्यासक्रमाच्या ७०० जागा वाढणार

याशिवाय या चित्रपटात सुहास मुंडे यांच्या गीतांना हर्षित अभिराज यांनी स्वरसाज चढवलेली तीन गाणी आहेत. यामुळे ‘बबन’ हा चित्रपट २०१८ मध्ये मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त संगीतमय पर्वणी ठरेल, असा विश्वास भाऊराव यांनी व्यक्त केला.