News Flash

सुपरहिट ‘बबन’ने गाठला ८.५ कोटींचा पल्ला

संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय ‘बबन’

'बबन'

भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘बबन’ या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं आहे. ग्रामीण भागाचा संघर्ष आणि रोमांचक प्रेमकहाणी सांगणाऱ्या या चित्रपटाची ग्रामीण भागात विशेष दखल घेतली जात आहे. २३ मार्चपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये ८.५ कोटींची बक्कळ कमाई केली आहे.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘ख्वाडा’ च्या घवघवीत यशानंतर ‘बबन’ला मिळत असलेल्या या उदंड प्रतिसादामुळे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याचीदेखील सर्वत्र चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

या चित्रपटातील अभिनेता भाऊसाहेब शिंदेने वठवलेली ‘बबन’ची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडत असून, नवोदित अभिनेत्री गायत्री जाधव हिनेदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ग्रामीण भागात या चित्रपटाचा बोलबाला अधिक होत असून, मुंबईबाहेरील सिनेमागृहात ‘बबन’ हाऊसफुल ठरत आहे. ‘बबन’ चित्रपटाच्या वाढत्या मागणीमुळे महाराष्ट्रात याचे शोजदेखील वाढवण्यात आल्याचं समजतंय.

वाचा : ही अभिनेत्री म्हणते, ‘मुस्लिम असल्यानेच मुंबईत घर मिळत नाही’

विशेष म्हणजे दर्जेदार कथानक आणि मांडणीसोबतच ‘बबन’ चित्रपटातील गाणीसुद्धा हिट ठरली आहेत. त्यापैकी ‘मोहराच्या दारावर’ या गाण्यावर प्रेक्षक सिनेमागृहात ठेका धरतानादेखील काही ठिकाणी दिसून येतात. यासोबतच इतर गाण्यांनीदेखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. ‘ख्वाडा’ च्या घवघवीत यशानंतर भाऊरावांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपटदेखील त्याच उंचीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 6:00 pm

Web Title: baban marathi movie crossed 8 crores
Next Stories
1 ही अभिनेत्री म्हणते, ‘मुस्लिम असल्यानेच मुंबईत घर मिळत नाही’
2 अभिनेत्री तब्बूची जोधपूर विमानतळावर छेडछाड
3 ‘बादशहा’ कारनं नाही तर हेलिकॉप्टरनं सेटवर जातो
Just Now!
X