18 January 2019

News Flash

सिंगापूरला पोहोचला ‘बबन’

'कस्सं...? बबन म्हणल तसं' म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला खुळ लावणाऱ्या, तसेच सलग चौथ्या आठवड्यातदेखील हाऊसफुल्ल ठरला आहे.

बबन

‘कस्सं…? बबन म्हणल तसं’ म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला खुळ लावणाऱ्या, तसेच सलग चौथ्या आठवड्यातदेखील हाऊसफुल्ल ठरत असलेल्या ‘बबन’ने आता थेट सिंगापूर गाठले आहे. सिंगापूरच्या मराठी सिनेरसिकांनादेखील हा सिनेमा पाहता यावा, यासाठी तेथील स्थानिक प्रेक्षकांकडून ‘बबन’च्या या खास स्क्रीनिंगची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार १५ एप्रिलला सिंगापूरमधील मराठी प्रेक्षकांसाठी ‘बबन’च्या खास स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात येणार आहे.

ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव यांची प्रमुख भूमिका आहे. ‘बबन’ सिनेमातील संवाद आणि गाण्यांनादेखील प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभत असून, हा सिनेमा मनोरंजनाबरोबरच सामाजिकतेचे अंजनदेखील प्रेक्षकांच्या डोळ्यात घालत आहे. तसेच, वर्षाच्या मध्यान्हात सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी सिनेमाच्या यादीत ‘बबन’चा समावेश झाला आहे. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित आणि भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित ‘बबन’ चा हा गावराण बाणा सिंगापूरमध्येदेखील आपली कमाल दाखवणार हे निश्चित.

वाचा : बलात्कार करणाऱ्यांना जगण्याचा हक्क नाही; रेणुका शहाणे यांची जळजळीत पोस्ट

विशेष म्हणजे दर्जेदार कथानक आणि मांडणीसोबतच ‘बबन’ चित्रपटातील गाणीसुद्धा हिट ठरली आहेत. त्यापैकी ‘मोहराच्या दारावर’ या गाण्यावर प्रेक्षक सिनेमागृहात ठेका धरतानादेखील काही ठिकाणी दिसून येतात. यासोबतच इतर गाण्यांनीदेखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. ‘ख्वाडा’ च्या घवघवीत यशानंतर भाऊरावांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपटदेखील त्याच उंचीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

First Published on April 14, 2018 2:49 am

Web Title: baban marathi movie to be screen in singapore