News Flash

“मला त्यांना रिप्लाय द्यावासा वाटत होता”- वडिलांच्या मेसेजने इरफानचा मुलगा भावूक

शेअर केले वडिलांचे जुने मेसेजेस

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अभिनेता इरफान खान यांचा कॅन्सर या आजारानं मृत्यू झाला. त्यांचे चाहते त्यांच्या आठवणींना कायम उजाळा देत असतात. त्यांचा मुलगा बाबिल हाही आपल्या वडिलांच्या आठवणी जागवत असतो. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तो कायम त्याचे आणि इरफान यांचे फोटो, एकमेकांसोबत घालवलेला वेळ याबद्दल सांगत असतो. नुकतीच त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात इरफान यांनी त्याला पाठवलेले मेसेजेस आहेत.

बाबिलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केलीये. यात इरफान यांनी बाबिलला पाठवलेले काही मेसेजेस दिसत आहेत. हे मेसेजेस इरफान यांनी गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात बाबिलला पाठवले होते. त्यात ते म्हणत आहेत, “बाबिल, तुझं झालं की मला फोन कर”, “मला पुन्हा फोन कर, हे खूप अर्जंट आहे”. जुने मेसेजेस डिलीट करत असताना बाबिलने हे मेसेजेस पुन्हा पाहिले आणि तो भावूक झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

त्याने ही पोस्ट शेअर करताना याच्या कॅप्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो लिहितो की, “हे काहीतरी वेगळंच घडतंय जे समजणं अवघड आहे. का काय माहित पण मी या मेसेजेसला रिप्लाय करणार होतो. असं वाटत होतं की ते माझ्योबतच आहेत.”

जेव्हा त्याने ही पोस्ट शेअर केली, तेव्हा इरफान यांचे चाहतेही भावूक झाले. काही चाहत्यांनी आपल्या प्रियजनांच्या आठवणीही कमेंट्समध्ये शेअर केल्या तर काही जणांनी बाबिलला समजावण्याचा, त्याला आधार देण्याचा प्रयत्न आपल्या कमेंट्समधून केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 3:29 pm

Web Title: babil shared irfan khans old messages wrote an emotional post vsk 98
Next Stories
1 ओटीटीवर गाजत असलेले ‘हे’ मराठी चित्रपट पाहिलेत का?
2 निलेश साबळेच्या कार्यक्रमात ओम-स्वीटूची हवा; ‘चला हवा येऊ द्या’मध्ये रंगला विशेष भाग
3 सारा अली खानचा बहिणीसोबतचा फोटो पाहिलात का?
Just Now!
X