12 July 2020

News Flash

‘बाबूजींची’ सोशल मीडिया यात्रा!

सध्याच्या माहिती युगात इंटरनेटवरील फेसबुक आणि टि्वटरसारख्या सोशल मीडिया व्यासपीठामुळे फोटो, विनोद, सुविचार, बातम्या आणि अन्य अनेक गोष्टींचा क्षणार्धात जगभरात प्रसार होतो. तसेच अनेक गोष्टी...

| January 13, 2014 04:54 am

सध्याच्या माहिती युगात इंटरनेटवरील फेसबुक आणि टि्वटरसारख्या सोशल मीडिया व्यासपीठामुळे फोटो, विनोद, सुविचार, बातम्या आणि अन्य अनेक गोष्टींचा क्षणार्धात जगभरात प्रसार होतो. तसेच अनेक गोष्टी आणि व्यक्ती चर्चेचा विषय बनतात. काही महिन्यांपूर्वी भारतीय चित्रपट सृष्टीचा महामानव (सुपरमॅन) म्हणून ओळखला जाणारा वरिष्ठ अभिनेता रजनीकांत त्याच्या विषयीच्या सोशल मीडियामध्ये फिरणाऱ्या असंख्य विनोदी पोस्टमुळे चर्चेत होता. त्याच्या पाठोपाठ ‘सीआयडी’मधील एसीपी प्रद्युम्न विषयीच्या अशाच प्रकारच्या अनेक पोस्ट सोशलमीडियामध्ये फिरत होत्या. हल्ली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अलोक नाथ हे सोशल मीडियाच्या निशाण्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विषयीचे अनेक संदेश सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत. रमेश सिप्पी यांच्या ‘बुनियाद’ मालिकेतील हवेली रामच्या भूमिकेद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अलोक नाथ यांनी नंतरच्या काळात ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके हैं कोन’, ‘हम साथ-साथ हैं’, ‘परदेस’, ‘ताल’, ‘विवाह’, ‘एक विवाह… ऐसा भी’ आणि इतर अनेक चित्रपटातून संस्कारी वडिलधारी व्यक्तीच्या भूमिका साकारल्या. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘बाबूजी’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. हाच धागा पकडून सोशल मीडियावर त्यांच्या विषयीचे अनेक विनोदी संदेश प्रसिद्ध होत आहेत. सध्या ते सोशल मीडियावरील चर्चित व्यक्तीमत्व झाल्याने माध्यमांनादेखील त्यांची दखल घ्यावी लागली.
‘हृदयविकाराचा झटका म्हणजे काय हे आपल्या देशाला आलोक नाथ यांच्यामुळे समजले’ अशा छोट्याशा टि्वटने याची सुरूवात झाली. पाठोपाठ ‘आईला पंजाबमध्ये थंडी वाजते म्हणून अलोक नाथ मुंबईत स्वेटर घालून बसतात’ हा संदेश प्रसिद्ध झाला आणि अशा असंख्य संदेशांची मालिकाच सुरू झाली. यातील बऱ्याचशा संदेशांमध्ये अलोक नाथ यांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावर साकारलेल्या संस्कारी वडिलधाऱ्या माणसाच्या व्यक्तीरेखेविषयी भाष्य करण्यात आले आहे. अलोक नाथ यांच्या मते, काही दिवसांपूर्वी ‘हम साथ साथ है’ (१९९९) हा चित्रपट टीव्हीवर दाखविण्यात आला होता. अज्ञात व्यक्तीने चित्रपटातील संस्कार आणि कौटुंबिक मूल्यावर आधारीत अलोक नाथ यांच्या भूमिकेबाबत संदेश प्रसिद्ध केला आणि या सर्व प्रकाराला सुरूवात झाली. सुरूवातीला थोडे नाराज झालेल्या अलोक नाथ यांनी नंतर मात्र या सर्व प्रकाराचे खुल्या दिलाने स्वागत केले.
सोशल मीडियावरील अलोक नाथ यांच्या विषयीचे काही खुमासदार संदेश –
1) Alok Nath was the first person to call ‘Parle’ as ‘Parle-G’.
2) Alok Nath is so sanskaari that he removes his slippers before playing Temple Run.
3) Alok Nath has never received salary, he always received pension.
4) Alok Nath appeared for IIT. Since then, it’s been called IIT-JEE
5) When Alok Nath was born, doctor said ‘Badhaai ho, babuji huay hain!
6) Alok Nath is so sanskari, ki uska ghar ka pressure cooker bhi seeti nahi Marta
7) Alok Nath believes the ‘F’ in FTV stands for Family
8) Alok Nath had all the Senior Citizen privileges since he was 6 years old.
9) Alok Nath has requested for ‘Saubhagyavati Raho’ button on Facebook.
10) Alok Nath has requested for an ‘Aashirwad’ button to Twitter.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2014 4:54 am

Web Title: babuji alok nath trending on social media
Next Stories
1 विनोदी मालिका ‘लापतागंजः एक बार फिर’मध्ये शिल्पा शिंदे
2 सुचित्रा सेन यांची तब्येत खालावली
3 अनिल कपूर-डिंपल कपाडियाची जोडी पुन्हा रुपेरी पडद्यावर
Just Now!
X