News Flash

‘बचना ऐ हसीनो’फेम मिनिषा लांबाने घेतला पतीसोबत काडीमोड

...म्हणून मिनिषा लांबाने घेतला घटस्फोट

गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर असलेली अभिनेत्री मिनिषा लांबा सध्या तिच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आली आहे. मिनिषाने पती रायन थामला घटस्फोट दिला आहे. पाच वर्ष एकमेकांसोबत संसार केल्यानंतर हे दोघं विभक्त झाले आहेत. मिनिषा आणि रायन यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतल्याचं मिनिषाने एका मुलाखतीत सांगितलं.

मिनिषा आणि रायन यांच्यात नात्यात मागील दोन वर्षांपासून दुरावा आला होता. त्यामुळे बऱ्याच वेळा सोशल मीडियावदेखील त्यांच्याविषयी चर्चा रंगत होत्या. मात्र या साऱ्यावर मिनिषाने मौन सोडलं आहे.


“रायन आणि मी विभक्त झालो आहोत. घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे”, असं मिनिषाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

दरम्यान, २०१३ मध्ये जुहूमधील एका नाईट क्लबमध्ये मिनिषा आणि रायनची भेट झाली होती. या भेटीचं मैत्रीत रुपांतर झालं आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये या दोघांनी काही मोजक्या पाहुण्यांच्या आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. रायन एक हॉटेल व्यावसायिक आहे. तर मिनिषा अभिनेत्री. तिने यहा चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘कॉरपोरेट’, ‘हनीमून ट्रॅव्हल्स’, ‘दस कहान‍ियां’, ‘किडनॅप’, ‘शौर्य’, ‘अनामिका’ या ‘बचना ऐ हसीनो’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 2:23 pm

Web Title: bachana ae hasino actress minissha lamba divorces husband ssj 93
Next Stories
1 गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना करोनाची लागण
2 “हा आपल्या पिढीसाठी अभिमानाचा क्षण”; मुनमुन दत्ताने व्यक्त केला राम मंदिराचा आनंद
3 सुशांत सिंह आत्महत्या; “गलिच्छ राजकारणाबद्दल कोण बोलतंय पाहा” कंगनाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
Just Now!
X