दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने गेल्या काही दिवसांपासून अनेकांचं लक्ष वेधलं आहे. तेलूगु अभिनेत्री श्री रेड्डी हिने हैदराबाद येथील तेलुगू फिल्म चेंबर्सबाहेर टॉपलेस होत कलाविश्वात आपलं शोषण होत असल्याचा मुद्दा उचलून धरल होता. त्यासोबतच तिने सुरेश बाबू यांचा मुलगा आणि अभिनेता राणा डग्गुबती याचा भाऊ अभिराम डग्गुबती याने आपलं लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक खुलासाही तिने केला होता. तेव्हापासूनच श्री रेड्डीच्या नावाच्या चर्चा चित्रपट विश्लात सर्वांच लक्ष वेधत होत्या.
सोशल मीडियाच्या माध्यमातून श्री रेड्डीने वारंवार काही गोष्टींचा उलगडा केल्याचंही पाहायला मिळालं. फेसबुकच्या लाइव्ह चॅटच्या माध्यमातून तिने आपण उच्च न्यायालयाची मदत घेत या प्रकरणीचा लढा देणार असल्याचं जाहीर केलं. आपल्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सर्वांविरोधात लढा देणार असल्याची तयारी तिने या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली. त्यासोबतच तेलुगू सुपरस्टार पवन कल्याण याचा आपल्या या सर्व प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.
वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये
आता तेलुगू चित्रपटसृष्टीतील काही बडी प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुटुंबांचे वाईट दिवस सुरु झाले असल्याचा इशाराही तिने दिला. त्यामुळे आता येत्या काळात श्री रेड्डी नेमकी कोणत्या सेलिब्रिटींवर तोफ डागत त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणते याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2018 11:48 am