24 November 2020

News Flash

अरे हे काय झालं? बादशाहने फोटो शेअर करताच चाहत्यांना पडला प्रश्न

पाहा, बाहशाहच्या चेहऱ्याला नेमकं काय झालंय?

बॉलिवूडचा लोकप्रिय रॅपर बादशाह याची लोकप्रियता काही वेगळी सांगण्याची गरज नाही. आज बादशाहचे असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे बादशाहदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा कायम प्रयत्न करत असतो. यात अनेकदा तो त्याचे फोटो, नवीन म्युझिक अल्बम चाहत्यांसोबत शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने शेअर केलेल्या पोस्टमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बादशाहने इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याचा चेहरा उन्हामुळे प्रचंड टॅन झाल्याचा दिसून येत आहे. बादशाह अलिकडेच सुट्टीसाठी मालदीवला गेला होता. मात्र, तिथे कडक उन्हामुळे त्याची त्वचा टॅन झाली आहे. म्हणून त्याने हा फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली.

 

View this post on Instagram

 

Sunburnt

A post shared by BADSHAH (@badboyshah) on

‘सनब्रर्नट’ असं कॅप्शन बादशाहने या फोटोला दिल आहे. त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंटदेखील केली आहे. दरम्यान, बादशाहने बॉलिवूडमध्ये आजवर अनेकांना आवाज दिला असून त्याचं ‘अभी तो पार्टी शुरु हुई है’, ‘सेल्फी ले ले रे’ अशी अनेक गाणी लोकप्रिय आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 4:57 pm

Web Title: badshah face looks very bad due to sun burnt photo viral dcp 98 ssj 93
Next Stories
1 ‘पृथ्वीराज’ व ‘KGF 2’ मध्ये संजयचे अॅक्शन सीन नाही? जाणून घ्या कारण
2 “नवोदित दिग्दर्शक इतरांना गृहित का धरतात?”; ऐनवेळी शूटिंगसाठी बोलवणाऱ्याला महेश टिळेकरांनी सुनावलं
3 चिमुकलीच्या शस्त्रक्रियेसाठी सोनू सूदने दिला मदतीचा हात
Just Now!
X