03 March 2021

News Flash

‘रजनी_कांत’ आणि अंकुशची जोडी जमली!

या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करत आहे

अंकुश चौधरी

‘बहू हमारी रजनी_कांत’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली रिधीमा पंडीत आता मराठी प्रेक्षकांची मनं जिंकायला सज्ज झाली आहे. लवकरच ती अंकुश चौधरीसोबत एक मराठी सिनेमा करणार आहे. या सिनेमात ती गावात राहाणाऱ्या एका साध्या मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवातही झाली.

‘बहू हमारी रजनी_कांत’ या मालिकेत रिधीमाने रजनी या ‘रोबोट’ची ही प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेने तिला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी मालिकेत यश मिळाल्यानंतर आता रिधिमा मराठी सिनेसृष्टीकडे वळत आहे. रिधिमाला ‘बहू हमारी रजनी_कांत’ ही मालिका करण्याच्याआधीपासूनच मराठीत काम करण्याची इच्छा होती आणि त्यात तिला आवडलेली भूमिका ऑफर झाल्याने तिने मराठी सिनेमासाठी लगेचच होकार दिला.

या सिनेमात ती अंकुश चौधरीसोबत ती झळकणार आहे. या सिनेमात काम करण्यासाठी ती फारच उत्सुक आहे. रिधिमाने या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून यातला तिचा लूक पुर्णपणे वेगळा आहे. ‘बहू हमारी रजनी_कांत’मध्ये रिधीमा एका मॉर्डन रूपात दिसली होती. पण या सिनेमातून ती साध्या रंगभूषेत आणि वेशभूषेत पाहायला मिळणार आहे. रिधीमाचे वडील मराठी असून तिची आई गुजराती आहे. सध्या ती मराठी सिनेमात काम करत असल्याने तिचे नातलगही फार खूश आहेत. या सिनेमासाठी ती सध्या कोंकणी भाषेचे शिक्षण घेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 7:43 pm

Web Title: bahu hamari rajanikant fame ridhima pandit will work with ankush choudhary in upcoming marathi movie
Next Stories
1 Aiyaary poster: सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
2 …म्हणून अल्का याज्ञिकने आमिरला खोलीबाहेर काढले
3 Happy Birthday Jitendra: ‘ग्रीटींग’मधून बालमित्र जागवणार ‘डेटींग’च्या आठवणी
Just Now!
X