उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या फाटक्या जिन्सवरील वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होताना दिसतेय. फाटकी जीन्स घालून फिरणारी महिला कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल, असं विधान रावत यांनी केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरांतून  टीका होतेय.

बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा हिने रावत यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिल्यानंतर बॉलवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनंतर बाहुलबली फेम कटप्पा यांच्या मुलीने रावत यांचा समाचार घेतला आहे.

बाहुबली सिनेमातील कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेत सत्यराज यांची मुलगी दिव्या सत्यराज हिने रावत यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ” तिरथ सिंह रावत मुलींनी काय कपडे घालावे हे तुम्ही शिकवू नका.आता तर मी माझी फाटलेली जिन्सच घालणार” असं म्हणत दिव्याने तिचे काही फाटलेल्या जीन्समधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. माहिलांच्या कपड्यांवरुन त्यांचं परिक्षण करू नये अशा आशयाची पोस्ट लिहत तिने एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.सोशल मीडियावरुन दिव्याच्या पोस्टवर अनेकांना सहमती दर्शवत तिला  पाठिंबा दिला आहे.

दिव्याने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमधून तिने हे देखील म्हंटलं आहे. कि, “कदाचित ज्यांना राजकारणात यायचं आहे किंवा जे राजकारणात आहेत ते फाटक्या जीन्समधील फोटो शेअर करणार नाहित. मात्र कटप्पाची मुलगी कधीच स्वत:ला बदलणार नाही. ती जशी आहे तसचं राहणं पसंत करते. “असही ती म्हणाली आहे.

नव्या नंदा सोबतच अभिनेत्री कंगना रणौतनेदेखील रावत यांच्या विधानावर त्यांना खडेबोल सुनावले होते.

काय म्हणाले होते रावत?

“एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. लोकांना भेटते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करते. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं,” असंही रावत म्हणाले. तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल,” असं विधान रावत यांनी केलं होतं.