बहुचíचत, तंत्रदृष्टय़ा विविध इफेक्ट असलेला आणि हिंदी चित्रपटाच्या इतिहासात सगळ्यात जास्त महसूल मिळविलेला ‘बाहुबली’ हा चित्रपट आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. ‘सोनी मॅक्स’ वाहिनीवरून २५ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा प्रीमिअर होणार आहे.

एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ चित्रपटाने सर्वच बाबतीत विक्रमांची नोंद केली आहे. सोशल मीडियावरील सगळ्यात लोकप्रिय साइट असलेल्या ‘फेसबुक’वर अवघ्या एका दिवसात तीन लाखांहून अधिकजणांनी त्याला ‘लाइक’ केले होते तर दोन लाख प्रेक्षकांनी तो ‘शेअर’ केला होता. तर चित्रपटाची झलक १५ लाखांहून अधिक जणांनी पाहिली होती.

चित्रपटासाठी कलातंत्रज्ञ म्हणून ८०० तंत्रज्ञांनी काम पाहिले तर चित्रपटातील राणा दुग्गुबातीचा सुमारे सव्वाशे फूट उंचीचा पुतळा उभा करण्यासाठी चार औद्योगिक वापराच्या क्रेन्सचा उपयोग करावा लागला होता.

चित्रपटातील या आणि अशा इतर अनेक ठळक गोष्टी चित्रपट पाहताना प्रेक्षकांना कळणार आहेत. २५ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता चित्रपटाचे प्रसारण होणार आहे.