News Flash

‘ही अभिनेत्री कधीही सुपरस्टार होणार नाही’; अभिनेत्यानं केलं वादग्रस्त वक्तव्य

सलमानसोबत बजरंगी भाईजानमध्ये झळकलेल्या मुन्नीवर अभिनेत्याने साधला निशाणा

अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्री हर्षाली मल्होत्रावर निशाणा साधला आहे. हर्षाली कधीही मोठी अभिनेत्री होऊ शकणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य त्याने केलं आहे.

अवश्य पाहा – ‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर मराठी कलाकारांची टीका

नेमकं काय म्हणाला केआरके?

“मी १०० टक्के खात्री देतो ही मुलगी कधीही मोठी अभिनेत्री होऊ शकणार नाही. लहानपणीच प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक बालकलाकाराची हीच समस्या आहे. ही मुलं स्वत:ला सुपरस्टार समजू लागतात. पण त्यांना देखील पुन्हा एकदा शुन्यापासूनच सुरुवात करावी लागते.” अशा आशयाचं ट्विट करुन केआरकेनं हर्षालीवर निशाणा साधला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – १७ व्या वर्षी झाली होती मिस इंडिया; बॉलिवूडची ‘दामिनी’ सध्या काय करतेय?

अवश्य पाहा – ‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन कसा केला शूट? दिग्दर्शकाने सांगितला अजब किस्सा

हर्षाली ही ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकली होती. तिने या चित्रपटात ‘मुन्नी’ हे पात्र साकारलं होतं. हा चित्रपट सलमान खान आणि हर्षालीभोवतीच फिरताना दिसतो. मुन्नी ही पाकिस्तानमधून भारतात येते. या लहान मुलीला तिच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी बजरंगी अर्थात सलमान स्विकारतो. त्यानंतर भारतातून पाकिस्तानात जाताना घडलेल्या विविध गंमतीजंमती या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 7:44 pm

Web Title: bajrangi bhaijaan harshaali malhotra salman khan kamaal r khan mppg 94
Next Stories
1 मामा-भाच्याचे वैर! कृष्णा आणि गोविंदामधील भांडणाचं खरं कारण काय?
2 सनी देओलनं विमानात चोरल्या होत्या चंकी पांडेच्या महागड्या सिगरेट्स; कारण…
3 पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची हत्या
Just Now!
X