15 October 2018

News Flash

चीनमध्ये या मजेशीर नावाने प्रदर्शित होणार ‘बजरंगी भाईजान’

शीर्षक कळल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

बजरंगी भाईजान

बॉलिवूडमधील ‘दबंग’ अभिनेता सलमान खानच्या २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. कदाचित याच कारणामुळे चित्रपटाला दोन वर्षे उलटूनही आता ‘बजरंगी भाईजान’ चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण, तेथे ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट याच शीर्षकाने प्रदर्शित होणार नसून त्यासाठी वेगळे शीर्षक ठरवण्यात आले आहे. हे शीर्षक कळल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

वाचा : ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत दीपिकापेक्षा टीव्ही अभिनेत्री सरस

कबीर खान दिग्दर्शित आणि सलमान, हर्षाली मल्होत्राचा दमदार अभिनय असलेला ‘बजरंगी भाईजान’ चीनमध्ये ‘लिटिल लोलिता मंकी गॉड अंकल’ या शीर्षकाने प्रदर्शित होईल. मिळालेल्या माहितीनुसार, चीनने १४० मिनिटांच्या रनिंग टाइमने चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला असून, ‘डाऊबन’ (Douban) वेबसाइटने त्याला ८.६ रेटिंग दिले आहे. मात्र, अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

वाचा : शनाया वागणार ‘शान्यासारखं’!

यापूर्वी, मि. परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाला होता. तेथे चित्रपटाला उत्तम प्रतिसादही मिळाला. चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दहा चित्रपटांमध्ये ‘दंगल’चा समावेश आहे. आता ‘बजरंगी भाईजान’ चीनमधील ‘दंगल’चा रेकॉर्ड मोडण्यात यशस्वी ठरतो का, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

First Published on December 7, 2017 12:20 pm

Web Title: bajrangi bhaijaan has a hilariously dubbed chinese name itll leave you in splits