News Flash

Video: ‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नीचा सलमानच्या ‘सीटी मार’ गाण्यावर डान्स

सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने अनेकांच्या मनावर जादू केली होती. तसेच या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बालकलाकार हर्षाली मल्होत्रा आजही साऱ्यांना आठवत आहे. ‘मुन्नी’ ही व्यक्तिरेखा साकारत हर्षालीने अनेकांची मने जिंकली होती. निरागस चेहरा आणि चेहऱ्यावर असलेले स्मित हास्य आजही प्रेक्षकांना भुरळ घालते. सध्या सोशल मीडियावर हर्षालीचा डान्स व्हिडीओ चर्चेत आहे.

हर्षालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटातील सीटी मार गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने जीन्स आणि टॉप परिधान केला असून ती अतिशय क्यूट दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकजण त्यावर कमेंट करताना दिसत आहेत.

आणखी वाचा : Indian Idol: ‘सर्व स्पर्धकांची प्रशंसा करण्यास सांगितले होते’, अमित कुमार यांचा खुलासा

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात हर्षालीने पाकिस्तानी मुलगी मुन्नीची भूमिका साकारली होती. ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात झळकण्यापूर्वी हर्षालीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ती ‘कुबूल है’, ‘लौट आओ तृषा’ आणि ‘सावधान इंडिया’ या मालिकेत दिसली होती. हर्षाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या एखाद्या बड्या स्टारप्रमाणेच आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 4:04 pm

Web Title: bajrangi bhaijaan munni aka harshaali malhotra dances on salman khan radhe seeti maar song avb 95
Next Stories
1 एकीकडे मुकेश खन्नांच्या निधनाची अफवा, तर दुसरीकडे बहिणीचा मृत्यू!
2 ईद निमित्तानं सलमानचं चाहत्यांना आवाहन; “घराबाहेर जमा होऊ नका, मी भेटायला येऊ शकणार नाही…”
3 Video: पहिल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिरने स्वत: रिक्षावर चिटकवले होते पोस्टर
Just Now!
X