बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने अनेकांच्या मनावर जादू केली होती. तसेच या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बालकलाकार हर्षाली मल्होत्रा आजही साऱ्यांना आठवत आहे. ‘मुन्नी’ ही व्यक्तिरेखा साकारत हर्षालीने अनेकांची मने जिंकली होती. निरागस चेहरा आणि चेहऱ्यावर असलेले स्मित हास्य आजही प्रेक्षकांना भुरळ घालते. सध्या सोशल मीडियावर हर्षालीच्या स्विमिंग पूलमधील फोटोंची चर्चा आहे.
हर्षालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती स्विमिंगपूलमध्ये असल्याचे दिसत आहे. या फोटोला २६ हजार पेक्षा जास्त लाईक्स आहेत. तिने हा फोटो शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
पाहा फोटो >> ‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नी आता अशी दिसते
‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात हर्षालीने पाकिस्तानी मुलगी मुन्नीची भूमिका साकारली होती. ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात झळकण्यापूर्वी हर्षालीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ती ‘कुबूल है’, ‘लौट आओ तृषा’ आणि ‘सावधान इंडिया’ या मालिकेत दिसली होती. हर्षाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या एखाद्या बड्या स्टारप्रमाणेच आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 2, 2020 1:50 pm