News Flash

‘ठाकरे’ चित्रपटासाठी नवाजुद्दीन नाही तर ‘हा’ दिवंगत अभिनेता होता निर्मात्यांची पहिली पसंती

जाणून घ्या कोण होता तो अभिनेता..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबा ठाकरे यांची आज जयंती. प्रबोधनकारांचे वारसदार, झुंजार नेते आणि परखड वक्ते असलेल्या बाळासाहेबांचा राजकीय प्रवास झंझावाती राहिला. २०१९मध्ये त्यांच्या जीवनावर एक चित्रपट आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद देखील मिळाला. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होता. पण सुरुवातीला निर्मात्यांनी या चित्रपटासाठी दुसऱ्या अभिनेत्याची निवड केली होती.

‘ठाकरे’ या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अमृता राव मुख्य भूमिकेत आहेत. नवाजच्या अभिनयाची आणि लूकची त्या वेळी चर्चा रंगली होती. पण तुम्हाला माहिती आहे का या चित्रपटासाठी निर्मात्यांनी नवाज ऐवजी दुसऱ्या एका कलाकाराची निवड केली होती.

IMDbनुसार, ठाकरे या चित्रपटासाठी सर्वात पहिली पसंती दिवंगत अभिनेता इरफान खान होता. पण इरफान इतर काही प्रोजेक्टसमध्ये व्यग्र असल्यामुळे त्याने चित्रपटाला नकार दिला होता. त्यानंतर निर्मात्यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीची निवड केली.

नवाजुद्दीनने चित्रपटात बाळासाहेबांची हुबेहूब भूमिका साकारली होती. खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. राऊत यांनीच पटकथा लिहिली असून अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २३ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 2:55 pm

Web Title: balasaheb thackeray birthday biopic film nawazuddin siddiqui irrfan khan avb 95
Next Stories
1 सलमान घालवतोय भाचीसोबत वेळ, व्हिडीओ व्हायरल
2 ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमध्ये होणार हुरडा पार्टी !
3 आता होणार ‘हंगामा’; शिल्पा शेट्टीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक
Just Now!
X