News Flash

‘दोन दिवसात घरी परत येईन’, बालसुब्रमण्यम यांचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ ते रुग्णालयात दाखल झाले तेव्हाचा आहे.

प्रसिद्ध गायक एस.पी.बालसुब्रमण्यम यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच बालसुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती. मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी वयाच्या ७४ वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बालसुब्रमण्यम यांच्या निधनानंतर त्यांचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये त्यांनी करोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याचे म्हटले असून त्यांच्या आरोग्याविषयी चिंता न करण्याचे आवाहन त्यांनी चाहत्यांने केले होते. ‘गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. घरी क्वारंटाइनमध्ये राहिल्यास कुटुंबीय अधिक चिंतेत राहतील म्हणून मी स्वत:ला रुग्णालयात दाखल करून घेतले’ असे त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

पुढे त्यांनी माझ्यावर सध्या उपचार सुरु असून मी दोन ते तीन दिवसांमध्ये घरी परत येईन असे म्हटले आहे. आता त्यांच्या निधनानंतर त्यांचा हा शेवटचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.

एक प्रतिभावंत गायक अशी बालसुब्रमण्यम यांची ओळख होती. ४० हजारांपेक्षा जास्त गाणी गाण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे एवढंच नाही तर एका दिवसात २१ गाणी म्हणण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 4:19 pm

Web Title: balasubrahmanyam last video avb 95
Next Stories
1 CSKने वाहिली बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली
2 ‘आज ते सगळं आठवतंय”; लता मंगेशकरांनी वाहिली एस.पी. बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली
3 एस.पी.बालसुब्रमण्यम यांची सदाबहार गाणी
Just Now!
X