23 October 2020

News Flash

दिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून…

‘बालिका वधू’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ या मलिकांसाठीदेखील त्याने काम केले आहे.

करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सर्वांनाच फटका बसला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाविश्वाला तर सर्वात मोठा फटका बसल्याचे म्हटले जाते. अशातच उदरनिर्वाहासाठी बालिका वधू या मालिकेच्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ आली. आता या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याने यावर प्रतिक्रिया दिली असून संपूर्ण टीम त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे असे म्हटले आहे.

या दिग्दर्शकाचे नाव आहे रामवृक्ष. सध्या ते उत्तर प्रदेशमधील त्यांच्या गावी भाजी विकण्याचे काम करत आहेत. लॉकडाउनचा काळ सुरु झाल्यानंतर रामवृक्ष त्यांच्या गावी उत्तर प्रदेश येथे गेले होते. मात्र, दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होऊ लागल्यामुळे त्यांनी भाजी विकण्यास सुरुवात केली. सध्या ते सायकलवरुन दारोदारी भाजी विकत आहेत. त्यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘बालिका वधू’ या मालिकेची टीम आता त्यांना मदत करण्यास पुढे आली आहे.

बालिका वधू या मालिकेत भूमिका साकारणारे अनूप सोनी यांनी नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ‘आमची बालिका वधूची टीम त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना जमेल त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत’ असे अनूप यांनी म्हटले आहे.

रामवृक्ष यांनी अनेक गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शन केले असून त्यांनी ‘बालिका वधू’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ या मलिकांसाठीदेखील काम केल्याचे सांगण्यात येते. “रिअल आणि रील लाइफ दोन्ही पाहावं लागतं. सध्या मुलांच्या परिक्षा सुरु आहेत त्यामुळे मुंबईमध्ये येणं शक्य नाही. तसंच मुंबईतही चित्रपटांचं काम बंद आहे. त्यामुळे या काळात कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी भाजी विकत आहे”, असे रामवृक्ष यांनी सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 5:01 pm

Web Title: balika vadhu team come to help out director avb 95
Next Stories
1 RCB-मुंबई सामना पाहून सुनील शेट्टी म्हणाला, “भाई लोग, …”
2 Video : ‘आई माझी काळुबाई मालिका पौराणिक नाही,तर…’
3 कंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज
Just Now!
X