News Flash

Video : भोजपुरी म्युझिक अल्बमसाठी अनुभव सिन्हा आणि मनोज वाजपेयी एकत्र!

पाहा, या नव्या भोजपुरी गाण्याचा टीझर

Video : भोजपुरी म्युझिक अल्बमसाठी अनुभव सिन्हा आणि मनोज वाजपेयी एकत्र!

अभिनेता मनोज वाजपेयी आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा एका म्युझिक अल्बमच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. अनुभव सिन्हा यांच्या प्रोडक्शन अंतर्गंत ‘बंबई में का बा’ या नव्या म्युझिक अल्बमची निर्मिती करण्यात आली असून नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे हा टीझर तरुणाईमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

अनुभव सिन्हा निर्मिती आणि दिग्दर्शित ‘बंबई में का बा’ या म्युझिक अल्बममध्ये मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत झळकला असून त्याच्याच आवाजामध्ये हे गाणं स्वरबद्ध झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात मनोज वाजपेयी पहिल्यांदाच एका रॅपरच्या रुपात दिसणार आहे.

“गेल्या २५-३० वर्षांपासून भोजपुरी संगीत डबल मीनिंग आणि अर्थहीन होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अनेक पानाच्या गाडीपासून ते चहाच्या टपरीपर्यंत बऱ्याचवेळा ही गाणी ऐकायला येतात. मात्र मागील १० वर्षांपासून भोजपुरी संगीतला योग्य दर्जा मिळावा यासाठी मी प्रयत्न करत आहे”, असं अनुभव सिन्हा म्हणाले.

दरम्यान, या गाण्याची निर्मिती अनुभव सिन्हाच्या बनारस मीडिया वर्क्स अंतर्गत करण्यात आली असून एका दिवसात या गाण्याचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या या गाण्याचा केवळ टीझर प्रदर्शित झाला असून हे गाणं लवकरच प्रदर्शित होईल असं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 12:56 pm

Web Title: bambai mein ka ba manoj bajpai turns rapper with this latest bhojpuri song ssj 93
Next Stories
1 ‘तारक मेहता का उलटा चष्मा’फेम नट्टू काका रुग्णालयात दाखल
2 यंदा ‘केबीसी’मध्ये होणार मोठा बदल; ऑडियन्स पोल होणार नाहीसा?
3 नुकसान मालिका कधी संपणार?
Just Now!
X