News Flash

सुशांतला ‘ती’ ऑफर कधी दिलीच नव्हती, महेश भट्ट यांचा मुंबई पोलिसांकडे खुलासा

वांद्रे पोलिसांनी नोंदवला महेश भट्ट यांचा जबाब

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जबाब वांद्रे पोलिसांनी नोंदवला आहे. यावेळी महेश भट्ट यांनी पोलिसांना आपण सुशांत सिंहला ‘सडक २’ चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी कधीही ऑफर दिली नव्हती असा खुलासा केला आहे. उलट सुशांत सिंहने महेश भट्ट यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सोबतच ‘सडक २’ चित्रपटातील कोणत्याही भूमिकेसाठी आपला विचार करण्याची विनंती केली होती. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

महेश भट्ट यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘सडक २’ चित्रपट सिक्वेल असल्याने नेहमीच संजय दत्तला मुख्य भूमिकेत घेऊनच चित्रपट तयार होणार होता. महेश भट्ट यांनी आतापर्यंत दोन वेळा सुशांतची आणि आपली भेट झाल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. “एकदा २०१८ मध्ये सुशांत आपली भेट घेण्यासाठी आलो होता. तर फेब्रुवारी महिन्यात सुशांतची प्रकृती बरी नसल्याने आपण त्याची भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्याचं युट्यूब चॅनेल, मी लिहिलेली पुस्तकं यावर बरीच चर्चा झाली. पण यावेळी कामाशी संबंधित कोणतीही चर्चा झाली नाही,” अशी माहिती महेश भट्ट यांनी दिली आहे.

सुशांत सिंहच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत कंगना , संजय लिला भन्साळी, आदित्य चोप्रा, रिया चक्रवर्ती अशा अनेकांची चौकशी केली आहे. १४ जूनला सुशांत सिंहचा वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी मृतदेह आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली असून याच्यावर नेमका कोणता दबाव होता याचा पोलीस शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 6:19 pm

Web Title: bandra police records statement of director mahesh bhatt over sushant singh suicide sgy 87
Next Stories
1 दिलजीत दोसांजच्या या शर्टची किंमत तुम्हाला माहितेय का?
2 पोलिसांच्या भीतीने स्पायडरमॅन करतोय लिफ्टने प्रवास; व्हिडीओ होतोय व्हायरल…
3 अलका कुबल पुन्हा दिसणार काळूबाईच्या भूमिकेत
Just Now!
X