06 August 2020

News Flash

अभिनेत्रीला करोनाचा संसर्ग; दोन महिन्यापूर्वीच दिलाय बाळाला जन्म

अभिनेत्रीने ट्विट करुन दिली करोना झाल्याची माहिती

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सध्या देशभरातील जनता त्रस्त झाली आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीला करोनाची लागण झाली असून तिच्यासोबत तिच्या कुटुंबातील काही अन्य सदस्यांनादेखील करोना झाला आहे. या अभिनेत्री स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कोयल मल्लिक आणि तिच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाली आहे. कोयलने ट्विटरवरुन ही माहिती देत सध्या आम्ही सगळे जण सेल्फ क्वारंटाइन झाल्याचं सांगितलं आहे. तिच्यासोबतच तिचे आई-वडील, पती निशपाल सिंह ऊर्फ राणे यांनाही करोनाची लागण झाली आहे.

“बाबा, आई, राणे आणि मी.. आम्ही करोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आहे. सेल्फ क्वारंटाइन केलं आहे”, असं ट्विट कोयलने केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Koel Mallick (@yourkoel) on

दरम्यान, कोयलला २ महिन्यांचं लहान बाळ असून ५ मे रोजी या बाळाचा जन्म झाला आहे. त्यामुळे सध्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनादेखील कोयलची काळजी वाटत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 9:33 am

Web Title: bangali actress koel mallick with he entire family corona test came positive ssj 93
टॅग Coronavirus
Next Stories
1 राधिका आपटेचा हॉलिवूडप्रवास; ‘अ कॉल टू स्पाय’साठी करते दिवसरात्र मेहनत
2 Video : अशोक पत्की सांगतात, ‘काळोख दाटूनी आला’ गाण्यामागील मजेदार किस्सा
3 मदतीवर गरजू कलाकारांऐवजी नाटय़ निर्मात्यांचा डल्ला
Just Now!
X