News Flash

‘बॅन्जो’ सिनेमातल्या ‘बाप्पा’ गाण्याचा टिझर प्रदर्शित

बाप्पा हे गाणे सोशल मिडिया साइटवर उद्या प्रदर्शित होणार आहे

‘ग्रेट ग्रँड मस्ती’ नंतर रितेश देशमुख कोणत्याच सिनेमात दिसला नाही. सिनेमांच्या निवडीबाबद तो आधीपेक्षा जास्त चोखंदळ झाला आहे. ‘बॅन्जो’ सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्याने हा सिनेमा का निवडला असेल हे तो ट्रेलर पाहूनच लक्षात आलं. या ट्रेलर पाठोपाठ आता या सिनेमातले गणपती बाप्पावर एक गाणे चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे सोशल मिडिया साइटवर उद्या प्रदर्शित होणार आहे. पण त्याचा टिझर मात्र नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर हे गाणे धम्माल करणार, असे गाण्याचा टिझर पाहिल्यानंतर तरी वाटते आहे. यापूर्वी हृतिकच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटातील ‘देवा श्रीगणेशा..’ हे गाणे तुफान गाजले होते. येणाऱ्या गणेशोत्सवात ‘देवा श्रीगणेशा’ बरोबर ‘बॅन्जो’ मधले हे ‘बाप्पा’ चे गाणेही ऐकायला येईल.
मराठीतील आघाडीचा दिग्दर्शक रवी जाधव आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘बालक-पालक’ या सुपरहिट सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आलेली दिग्दर्शक रवी जाधव आणि अभिनेता रितेश देशमुख ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळेल. आगामी ‘बॅन्जो’ या हिंदी सिनेमातून ते आपली जादू दाखवणार आहेत. नक्की हा सिनेमा काय असणार हे पाहण्याची सगळ्यांमध्येच उत्सुकता लागून राहिली आहे. सिनेमाच्या ट्रेलरवरुन सिनेमाबद्दलची उत्सुकता अजून वाढली आहे.
विशेष म्हणजे या सिनेमात बॉलीवूड सुंदरी नर्गिस फाखरीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. समाजात दुर्लक्षित घटक असलेल्या ‘बॅन्जो’ वादकांवर या सिनेमाची कथा चित्रीत करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ‘बॅन्जो’ वादकांवर आणि त्यांच्या आयुष्यावर हा सिनेमा प्रकाशझोत टाकेल. रितेश देशमुख चित्रपटात ‘बॅन्जो’ वादकाची भूमिका साकारत असून, नर्गिस डीजेच्या भूमिकेत दिसेल. बहुचर्चित ‘बॅन्जो’मधील रितेशची भूमिका ही त्याने आधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा हटके आहे. या भूमिकेसाठी त्याने खास मेहनत घेतल्याचे समजते. चित्रपटात ‘बॅन्जो’ वादकाची मुख्य भूमिका साकारणारा रितेश मोठ्यापडद्यावर ‘बॅन्जो’ पथकाच्या प्रमुखाच्या रुपात पाहायला मिळणार आहे. त्यासाठी त्याने बॅन्जो वादनाचे प्रशिक्षणही घेतल्याचे समजते. इतकेच नव्हे तर दिग्दर्शकाच्या मागणीनुसार रितेशने नाल्यातून एण्ट्री केली असून, ‘बॅन्जो’च्या ट्रेलर प्रदर्शनावेळी रितेशच्या या एण्ट्रीची सिनेरसिकांमध्ये खूप चर्चा रंगली होती. ‘बॅन्जो’ या इरॉस इंटरनॅशनलच्या या सिनेमाच्या नावावरूनच हा सिनेमा संगीतप्रधान असणार हे कळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 2:43 pm

Web Title: banjo movies bappa songs teaser release
Next Stories
1 नर्गिस फाख्रीला घातला ६ लाखांचा गंडा…
2 जॅकलिनला हवाय ‘जुडवा २’
3 ..आणि रणवीर सिंगने मारली आकाशातून उडी
Just Now!
X